रामायण काल्पनिक व धार्मिक कथा, लोकांना बनवत आहे मानसिक गुलाम; भाजपचे माजी खासदार राजकुमार सैनी यांचे वक्तव्य

SHARE:

हरियाणा – धार्मिक कथा आणि रामायणावरून कुरुक्षेत्रचे माजी खासदार राजकुमार सैनी यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी रामाणय हे काल्पनिक असल्याचा दावा केला. इतकेच नाही तर देशभरात बापू लोकांकडून होणाऱ्या धार्मिक कथांवरूनही निशाना साधला. माजी खासदार राजकुमार सैनी म्हणाले कि धार्मिक कथा लोकांना मानसिक गुलाम बनवत आहेत. ते रविवारी फरिदाबादमधील हॉटेल मॅगपाई येथे बोलत होते. येथे सैनी समाजाच्या सदस्यांनी त्यांना ४ एप्रिल रोजी होणाऱ्या सम्राट अशोकाशी संबंधित एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते.

माजी खासदार राजकुमार सैनी म्हणाले की त्यांच्या समाजातील लोकांची काल्पनिक कथांमुळे बऱ्याच काळापासून दिशाभूल झाली आहे. रामायण काल्पनिक असल्याचे सांगत ते म्हणाले की मूळ रामायण ललाई सिंह यादव यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात असल्याचा दावा केला जातो, ज्याला पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांनी प्रोत्साहन दिले होते. त्यांनी असाही दावा केला की सर्वोच्च न्यायालयानेही ९ नोव्हेंबर १९७६ रोजी या मुद्द्यावर निर्णय दिला होता.

राजकुमार सैनी यांनी धार्मिक कथा आणि स्वयंघोषित संत आणि कथा करणार्यांवरही टीका केली. ते म्हणाले की अनेक कथाकार धार्मिक कथा सांगून लोकांचे खऱ्या समस्यांपासून लक्ष विचलित करत आहेत आणि त्यांना मानसिक गुलाम बनवत आहेत. सैनी यांनी असा आरोप केला की, कथाकार या कथा लाखो रुपयांसाठी सांगतात, ज्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो.
रावणाच्या दहा डोक्यांचे उदाहरण देत ते म्हणाले की, अशी व्यक्ती कधीही अस्तित्वात नव्हती आणि या सर्व केवळ भागडकथा आहेत. माजी खासदार म्हणाले की जेव्हा लोक सम्राट अशोक, गौतम बुद्ध, ज्योतिबा फुले आणि भीमराव आंबेडकर यांसारख्या महान पुरुषांचे साहित्य वाचतील, तेव्हाच त्यांना त्यांचे हक्क समजतील. ते म्हणाले कि जोपर्यंत लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव होत नाही, तोपर्यंत त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये भेदभावाला सामोरे जावे लागेल.

माजी खासदारांनी केंद्र आणि राज्य सरकारांवर रोजगारात भेदभाव केल्याचा आरोपही केला. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा संदर्भ देत ते म्हणाले की लहान देशसुद्धा महासत्तांना आव्हान देऊ शकतात. आज इराणने सर्व देशांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले आहे. अमेरिकेने हे लक्षात घेतले पाहिजे की कोणताही देश त्यांचा गुलाम नाही.

माहित असावे कि अंबाला येथील रहिवासी असेलेले राजकुमार सैनी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली आणि नवीन जिंदाल यांचा पराभव करून विजय मिळवला. मात्र, २०१९  च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिले नाही. यानंतर त्यांनी २०१९ मध्ये गोहाना मतदारसंघातून निवडणूक लढवली, परंतू त्यांचा पराभव झाला.

Leave a Comment

अधिक वाचा