सोलापूर – पंढरपूर मधे विद्यमान नगरसेवकाने ३ जणांवर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे, तर या घटनेत २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पंढरपुरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पंढरपुरामध्ये एका नगरसेवकाकडून ३ जणांवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात ही हल्ल्याची घटना घडली आहे. पंढरपुरमध्ये एका नगरसेवकाने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने ३ जणांवर कोयत्याने हल्ला केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरातील या हल्ल्याच्या घटनेत ३ तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
एका विद्यमान नगरसेवकानेच अशाप्रकारे भयानक हल्ला केल्याने पंढरपुर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात पंढरपुर पोलिसांकडून एका विद्यमान नगरसेवकांसह एकुण २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. पंढरपुरमधील लोकेश यादव गुन्हा दाखल झालेल्या विद्यमान नगरसेवकाचे नाव आहे. ते भालचंद्र भालके गटाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे विद्यमान नगरसेवक आहेत. पंढरपुरमध्ये लोकेश यादव यांच्यासह माजी नगरसेवक नागेश यादव आणि इतर २० जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, पंढरपूर शहरात ही घटना राजकीय वादातुन हल्ल्याची घटना घडली आहे. आरोपी नगरसेवक लोकेश यादव आणि त्याचे साथीदार पीडित व्यक्तींकडे वारंवार भिशी लावण्याचा तगादा लावत होते. मात्र, संबंधित ३ जणांनी भिशी लावण्यास नकार दिल्याने आरोपींचा हा हल्ला केला आहे. याच कारणाने लोकेश यादव आणि नागेश यादव यांनी आपल्या साथीदारांसह मिळून या ३ जणांवर कोयत्याने हल्ला केला आहे. पंढरपुरमधील या हल्ल्याच्या घटनेत ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. पंढरपुर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपुरमधील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
या हल्ल्यानंतर पंढरपुर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित व्यक्तींच्या तक्रारीवरून पंढरपूर पोलिसांनी नगरसेवक लोकेश यादव आणि माजी नगरसेवक नागेश यादव यांच्यासह एकूण २० जणांविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात असा एका जबाबदार लोकप्रतिनिधी िंवा प्रशासनातील लोकांकडून अशा प्रकारे गुन्हेगारी कृत्य घडल्यामुळे पंढरपुरात कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पंढरपुरातील अशा घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणातील फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध घेत आहे. या प्रकरणात अधिक तपास पंढरपुर पोलिस करत आहेत.





