बिहार – सारण जिल्ह्यातील मधौरा ब्लॉकचे जेडीयू ब्लॉक अध्यक्ष, बलीराम सिंग उर्फ गामा सिंग यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, गामा सिंग एका तरुणीसोबत शेतातून पळताना दिसत आहेत. व्हिडिओ बनवणार्या स्थानिक तरुणांचा दावा आहे की, ते दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत आढळले होते. या व्हिडिओमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हा व्हिडिओ शनिवार रात्री उशिराचा असल्याचे म्हटले जात आहे. त्यामध्ये, काही तरुण ओरडत, एका तरुणीचा पाठलाग करत आणि व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत. ती तरुणी घाबरलेल्या अवस्थेत पळताना दिसत आहे आणि पळता पळता ती गामा सिंग यांच्याजवळ पोहोचते. तरुणांनी त्यांना पाहताच स्थानिक बोलीत ओरडून म्हणतात हे हा तर गामा चाचा आहे! सांगा, गामा चाचा, तुम्ही पण हेच करत आहात का?
जेव्हा तरुणांनी तिचा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती मुलगी संतापल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिने आपल्या चपला काढल्या आणि तिचे चित्रीकरण करणाऱ्या पुरुषांच्या दिशेने धावत जाऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ बनवू नये म्हणून ती वारंवार विनवणी करत असल्याचेही दिसते. व्हिडिओच्या शेवटी, जेडीयू नेता त्या महिलेला घेऊन जाताना दिसतो. व्हिडिओ चित्रित करणाऱ्या तरुणांचा दावा आहे की जेडीयू नेता आणि ती तरूणी शेतात आक्षेपार्ह स्थितीत होते आणि पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी पळ काढला.
मात्र बलीराम सिंह हे आरोप फेटाळून लावले. यांनी घटनेला एक कट म्हटले आहे. बलीराम सिंग म्हणाले कि ते शेतात गहू कापणी करून परत येत असताना एक घाबरलेली मुलगी त्यांच्याजवळ आली. त्याच क्षणी, काही तरुणांनी या घटनेचे चित्रीकरण सुरू केले. नंतर त्यांनी मुलीला रस्त्यावर उतरवले, जिथून ती एका टेम्पोमधून निघून गेली. बलीराम सिंह यांनी आरोप केला आहे की राजकीय विरोधक त्यांना बदनाम करण्यासाठी असा कट रचत असून सत्यता न तपासता व्हिडिओ व्हायरल करून त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गामा सिंह यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जेडीयू पक्षाने या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. पक्षाने जिल्हाध्यक्षांना दोन दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.





