संभाजीनगर – नोकरी मिळण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांची लाखो रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. संभाजीनगरमधील मुलांना रेल्वेत नोकरी मिळण्याचे स्वप्न महागात पडलेले आहे. संभाजीनगरमधील तरुणांची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील बेरोजगार तरूणांना रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक करणार्या एका टोळीचा भांडाफोड करण्यात आला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वीरगाव आणि आसपासच्या भागातील एकूण ३७ सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणात ३७ पीडित तरुणांनी रविवारी वीरगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. आणि न्याय मिळण्याच मागणी केली आहे. माहितीनुसार, या फसवणुकीचे धागेदोरे उत्तराखंड राज्यापर्यंत पोहोचत असल्याचे उघड झाले आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वीरगावातील ३ ते ४ जण एजंट म्हणून काम करत होते. आणि त एजंट उत्तराखंड राज्यामधील रुद्रपूर येथील मुख्य आरोपींपर्यंत पैसे पोहोचवत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. या प्रकरणात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची फसवणूक करणार्या या गुन्हेगारी टोळीने साखळी पद्धतीने जाळे उभारले होते.
एका व्यक्तीला फसवल्यानंतर त्याच्यामार्फत आणखी 2 जणांना फसवण्याची पद्धत वापरली जात होती. नोकरीच्या नावाखाली प्रत्येक तरूणाकडून ३० हजार ते १.५ लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरसह शेजारील तालुक्यांतील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी आर्थिक फसवणुक झाली आहे. पैसे दिल्यानंतर बराच काळ उलटूनही बेरोजगारांना नोकरी मिळाली नाही. यासंदर्भात नोकरी न मिळाल्याने मोठा संशय निर्माण झाला. त्यानंतर संबंधित लोकांकडे पैशांची मागणी केल्यावर आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली आहे, असे फसवणुक झालेल्या पीडित बेरोजगार तरूणांनी सांगितले आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्व ३७ सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी एकत्र येऊन वीरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रार अर्जामध्ये वीरगावातील ४ संशयित आरोपींची नावे टाकण्यात आली आहेत. वीरगाव पोलिसांनी तक्रार अर्ज स्वीकारून चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सांगितले आहे की, संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ३७ सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून रेल्वेत नोकरीच्या आमिषाने मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. संबंधित पीडित सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून जबाब नोंदवून घेतले आहेत, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली आहे.
पीडित बेरोजगार तरूण अक्षय वाकडे, हनुमंतगाव यांनी सांगितले की, शिक्षणानुसार नोकरी मिळेल या आशेने त्यांनी वीरगावातील एका व्यक्तीकडे ३५ हजार रुपये दिले होते, मात्र नोकरी मिळाली नाही. तसेच परमेश्वर गायकवाड, पिंपळगाव नगीना यांनी सांगितले की, रेल्वे नोकरीसाठी त्यांनी एका व्यक्तीमार्फत दीड लाख रुपये दिले, पण त्यांचीही फसवणूक झाली आहे. या घटनेमुळे वैजापूर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेत संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील ३७ सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लाखो रूपयांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात अधिक तपास वैजापूर पोलिस करत आहेत.





