शिंदे गटाचे नगरसेवक राम आशिष यादव यांना महिलेकडून चपलेने मारहाण; सोशल मीडिया वर विडिओ वायरल, कारण अजून स्पष्ट नाही

SHARE:

मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेतील एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक राम आशिष यादव यांना एका महिलेने चपलेने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्यात महिला शिंदे गटाचे नगरसेवक राम आशिष यादव यांना चप्पल फेकूण मारताना दिसत आहे. याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेने राजकीय वर्तूळात खळबळ माजली आहे.
व्हिडिओमध्ये ती महिला नगरसेवक राम आशिष यादव यांना चपलेने मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, तर आजूबाजूचे लोक मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्याने, तिथे मोठी गर्दी जमली आणि कोणीतरी याचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केला.

व्हिडिओ व्हायरल होताच, विरोधी पक्षांनी शिंदे गटावर हल्ला चढवायला सुरुवात केली. हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे त्या महिलेचे नेमके कारण अस्पष्ट असले तरी, राम आशिष यादव यांचा वादग्रस्त इतिहास पाहता, या घटनेकडे त्याच परंपरेचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे. स्थानिकांनीही या प्रकरणावर चर्चा सुरू केली आहे.

राम आशिष यादव हे नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. २०१९ मध्ये एका तरुणीने त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. पीडितेला अश्लील व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल करत दोन वर्ष अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यावेळी हे प्रकरण चर्चेत आले होते. इतकेच नाही तर, राबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे वृत्त आहे. इतकेच नाही तर त्यांना यापूर्वीही नवी मुंबईतून तडीपार करण्यात आले आहे.

यादव यांचा राजकीय प्रवासही सातत्याने बदलत राहिला आहे. ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपशी संबंधित होते. नंतर निवडणुकीपूर्वी शिंदे गटात सामील झाले. मारहाणीमागे खरे कारण काय आहे? हा वैयक्तिक वाद आहे की यामागे काही अन्य कारण आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासानंतरच समोर येतील. मात्र या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा