मैत्रिणीकडून ब्लॅकमेलिंग व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या; डॉ. मंदार दाभाडे मृत्यू प्रकरणात नवा खुलासा

SHARE:

बीड – अंबाजोगाई मधे डॉ. मंदार दाभाडे मृत्यू प्रकरणात नवा खुलासा करण्यात आला आहे, या प्रकरणात सतत मैत्रिणीकडून ब्लॅकमेलिंग व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. बीडमधील डॉ. मंदार दाभाडे मृत्यू प्रकरणात आता नवे पुरावे समोर आले आहेत. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर मंदार दाभाडे यांच्या आत्महत्येचे कारण आता उघड झाले आहे. अंबाजोगाईत निवासी डॉक्टरने आत्महत्या केली होती. बीड जिल्ह्यातील एका मैत्रिणीकडून होणाऱ्या सततच्या ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून डॉ. मंदार यांनी आत्महत्या केली आहे.

या प्रकरणात बीड पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पुढील तपास सुरू आहे. डॉ. मंदार दाभाडे हे अंबाजोगाई शहरातील संत रोहिदासनगर भागात रमेश प्रल्हादराव सातपुते यांच्याकडे भाड्याने खोली घेऊन राहत होते. ६ एप्रिल २०२६ रोजी त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी डॉ.मंदार दाभाडे यांनी आपला भाऊ लौकिक दाभाडे याला मोबाइलचा पासवर्ड मेसेजद्वारे पाठवला होता. हा पासवर्डच पुढे त्यांच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट करणारा सर्वात मोठा पुरावा ठरला आहे. डॉ. मंदार दाभाडे यांच्या निधनानंतर संपूर्ण दाभाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

डॉ. मंदार दाभाडे यांचा अंत्यविधी पार पडल्यानंतर, भाऊ लौकिक दाभाडेने डॉ. मंदार दाभाडेने पाठवलेला पासवर्ड वापरून त्यांचा मोबाइल उघडला. मोबाइल मधील डेटा तपासत असताना त्यात एक सुसाईड नोट आढळून आली. या चिट्ठीत डॉ. मंदार दाभाडे यांनी आपल्या मनातील वेदना मांडल्या होत्या. डॉ. मंदार दाभाडे यांनी लिहिलेल्या चिट्ठीत स्नेहल पाटील नावाच्या तरुणीचा उल्लेख करण्यात आला आहे. ही तरुणी डॉ. मंदार दाभाडे यांची मैत्रीण होती, मात्र गेल्या काही काळापासून ती त्यांना ब्लॅकमेल करत होती. या सततच्या त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीमुळे मानसिक दडपणाखाली येऊन डॉ. मंदार दाभाडे यांनी आत्महत्या केली आहे, असे सुसाईड नोटवरून समजले आहे.

डॉ. मंदार दाभाडे मृत्यू प्रकरणात भाऊ लौकिक दाभाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आणि मोबाइलमधील पुराव्यांच्या आधारे, अंबाजोगाई पोलिसांकडून स्नेहल पाटील या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका उच्चशिक्षित निवासी डॉक्टरला अशा प्रकारे आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि अंबाजोगाई शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई पोलीस आता डॉ. मंदार दाभाडे आणि स्नेहल पाटील यांच्यातील चॅटस आणि कॉल रेकॉडर्सची चौकशी करत आहेत. नेमके ब्लॅकमेलिंग कशासाठी केले जात होते? याची चौकशी अंबाजोगाई पोलीस करत आहेत. या प्रकरणात अधिक तपास अंबाजोगाई पोलिस करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा