राज्यात 34 जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी ४७१ व ३१२० सदस्य पदासाठी ग्रामपंचायत निवडणूका होणार; २८ एप्रिल ला होणार मतदान

SHARE:

मुंबई – राज्यात ३४ जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी ४७१ व ३१२० सदस्य पदासाठी ग्रामपंचायत निवडणूका होणार आहेत. राज्यातील ३५९१ जागांवर निवडणूक होणार आहेत, तर २८ एप्रिल २०२६ ला राज्यात मतदान होणार आहे. राज्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सध्या गावागावात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा रणसंग्रामपाहायला मिळणार आहे.

जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सरपंचपदासाठी ४७१ आणि ३१२० ग्रामपंचायत सदस्य रिक्त जागांवर निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. सध्या गावागावात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी जोरदार सुरू झाली आहे. राज्यात अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत.राज्यातील गावागावात निवडणुकांचा धुराळा उडू लागला आहे.

ग्रामपंचायत सदस्यपदांच्या तसेच सरपंचांच्या रिक्तपदांच्या ग्रामपंचायत पोटनिवणुकांसाठी राज्यात मतदान होणार आहे. २८ एप्रिल २०२६ रोजी राज्यात मतदान होणार आहे. राज्यात संबंधित ग्रामपंचायत पोटनिवडणुकांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज ७ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत दाखल करता येतील. उमेदवारी अर्जाची छाननी १५ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.उमेदवारी अर्ज १७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील.

राज्यात २८ एप्रिल 2026 रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २९ एप्रिल 2026 रोजी होईल. मात्र राज्यातील गडचिरोली व गोंदिया या नक्षलवादी भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. राज्यात निवडणूका जाहीर झाल्याने गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Leave a Comment

अधिक वाचा