सातारा – जिल्ह्यात एका अल्पवयीन मूलाचा बापानेच खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात विजापूर पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. एका नराधम बापानेच अल्पवयीन मूलाची हत्या केल्याची घटना कराडमधील शिवडे ही या ठिकाणी घडली आहे. अल्पवयीन मूलगा आपला नसल्याच्या संशयातून कृष्णा नदीत अल्पवयीन मूलाला फेकल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात ही घटना २० दिवसांनी समोर आली आहे. अल्पवयीन मूलाच्या खुनाचे भयानक सत्य समोर आले आहे. या घटनेत कृष्णा नदी पात्रात मागील महिन्यात १८ मार्च २०२६ ला एका अल्पवयीन मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला होता. या घटनेचा तपास करत असताना पोलिसांना काही धक्कादायक माहिती मिळाली आहे.
साताऱा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शिवडे गावातून ही एक अतिशय खळबळजनक घटना उघड आली आहे. कराड तालुक्यातील शिवडे गावाच्या हद्दीतील कृष्णा नदी पात्रात १८ मार्च २०२६ ला ही घटना घडली आहे. या मृतदेहाची ओळख पटली आहे. तर एका बापानेच आपल्या अल्पवयीन मूलाचा खुन केल्याचे पोलिस तपासात समोर झाले आहे. या घटनेने कराड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहे. मात्र, 20 दिवसांनी या अल्पवयीन मूलाच्या खुनाचे प्रकरण उघडकीस आले आहे. माहितीनुसार, घटनेतील मृतदेह कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील नागठाणे गावातील सिद्धार्थ आरेकरी या अल्पवयीन मूलाचा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
सिद्धार्थचा बाप मल्लिकार्जुन आरेकरी याला त्याचे काही मित्र सिद्धार्थ हा तुझा मूलगा नाही, असे चिडवत. सिद्धार्थ तुझ्यासारखा दिसत नाही, असे मित्र चिडवत असल्याने मल्लिकार्जुन हा पत्नी भाग्यश्रीवर संशय घेत होता. तसेच तो मागील दीड वर्षापासून पत्नीशी भांडत होता. मागील महिन्यात १६ मार्च २०२६ ला त्याने सिद्धार्थला शाळेत ॲडमिशन घेण्याचा बहाणा करत घरातून विजापूरहून साताऱा जिल्ह्यातील उंब्रजमध्ये आणले. आणि तेथून तो सिद्धार्थला घेऊन कराडमधील शिवडे गावच्या हद्दीत कृष्णा नदीकाठी आला होता. कोणी नसल्याचे पाहून त्याने सिद्धार्थला कृष्णा नदीत फेकून दिले होते, अशी माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. विजापूर पोलिसांकडून आरोपी मल्लिकार्जुन आरेकरी याला अटक करण्यात आले आहे. या प्रकरणात अधिक तपास सातारा पोलिस आणि विजापूर पोलिस करत आहेत.





