उत्तर प्रदेश – खासगी कंपनीतील पगार वाढ आंदोलनात हिंसाचार झाला आहे, तर जमावाकडून पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे. उत्तप्रदेशातील नोएडा येथील एका खासगी कंपनीत पगार वाढीसाठी झालेल्या आंदोलनात कंपनी कर्मचाऱ्यांकडून हिंसाचार करण्यात आला आहे. याप्रकरणात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे उत्तरप्रदेशमधील पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला आहे.खासगी कंपनीच्या आंदोलकांनी मोठा गोंधळ केला आहे. नोएडामध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रू धुराचा वापर करावा लागला आहे.
उत्तरप्रदेशामध्ये पोलिसांनी हवेत गोळीबार केला. नोएडामध्ये मागच्या ३ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा अचानक भडका उडाला आहे. नोएडामध्ये सॅलरी आणि इंक्रीमेंटवरून खासगी कंपनीतील कर्मचार्यांचे मागील ७० तासांहून अधिक वेळ आंदोलन सुरू आहे. अखेर खासगी कंपनीच्या कामगारांचा संयम संपला आहे.आणि आंदोलनात िंहंसाचार झाला आहे. या खासगी कंपनीच्या आंदोलकांनी मोठा गोंधळ निर्माण केला आहे. उत्तरप्रदेश राज्यामध्ये नोएडातील फेज-२ परिसरात पगार वाढ आणि चांगल्या सोयीसुविधांसाठी आंदोलन करणार्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
नोएडामध्ये संतप्त जमावाने पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करत काही वाहने पेटवून दिली आहेत. यामुळे नोएडातील संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. उत्तर प्रदेशातील ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नोएडातील सेक्टर-८४ आणि फेज-२ परिसरात मोठ्या संख्येने खासगी कंपन्यांचे कर्मचारी जमा झाले होते. पगारवाढीच्या मागणीसाठी हे कर्मचारी रस्त्यावर उतरले. जेव्हा पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला आहे. तेव्हा आंदोलकांचा संयम सुटला आहे बघता बघता शांततेत सुरू असलेले आंदोलन हिंसक झाले आहे.
या हिंसाचारात २ ते ३ गाड्यांना आग लावण्यात आली आहे. तर अनेक वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. खासगी कंपनीच्या कामगारांचा राग शांत करण्यासाठी योगी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार जास्तीचे काम केल्यास कामगारांना दुप्पट पगार मिळणार. पगार आणि बोनसची रक्कम मिळणार. आता बँक खात्यात वेळेवर जमा करणे अनिवार्य केले आहे. आठवड्यातून एक दिवस सुट्टी आणि रविवारी काम केल्यास दुप्पट मजुरी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी मेहा रूपम यांनी दिले आहेत. प्रशासनाने या सवलती जाहीर करूनही पुन्हा कर्मचारी रस्त्यावर उतरले आहे, आणि हिंसाचार झाला आहे.
राज्यात सध्याच्या महागाईच्या काळात जुन्या पगारात घर चालवणे कठीण झाले आहे, अशी भावना आंदोलक व्यक्त करत आहेत. जिल्हा प्रशासनाने रविवारी कर्मचारी प्रतिनिधींशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तरीही कामगारांचे समाधान झाले नाही. पगारवाढीच्या मुद्द्यावर खासगी कंपनी कर्मचारी ठाम आहेत. याच आंदोलनामुळे नोएडामध्ये वाहतूक कोंडी झाली. या प्रकरणात पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. या सगळ्या प्रकारात आंदोलनकर्त्यानी कंपनीविरोधात संताप व्यक्त केला आहे.





