अहिल्यानगर – रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर शिर्डीत चौकशीसाठी हजर झाली आहे. समता पतसंस्थेतील १३२ खातेप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची बहिण प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या. अशोक खरातशी संबंधित १३२ खात्याची कायदेशीर चौकशी केली जात आहे. महिलांचे शोषण आणि अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी तुरुंगात असणार्या भोंदू अशोक खरात प्रकरणातील चौकशीला वेग आला आहे. समता पतसंस्थेतील १३२ संशयास्पद खात्यांच्या प्रकरणात ही मोठी कडक कारवाई केली आहे.
अशोक खरात नॉमिनी असलेल्या या १३२ खात्यांमधून झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहारप्रकरणी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांची चौकशी सुरू आहे. समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असलेली एकूण १३२ खाती शिर्डी पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार, ४ खाती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर आहेत. यामध्ये प्रतिभा चाकणकर यांच्या नावे २, तर त्यांच्या मुलांच्या नावे २ खाती असल्याचे समोर आले आहे.
माहितीनुसार, प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावावर असलेल्या या ४ खात्यांमधून २ कोटी ४० लाख रुपयांचे व्यवहार झाले आहेत. इतकी मोठी रक्कम खात्यात कोठून आली? आणि या व्यवहारांचे स्वरूप काय होते? या संदर्भात शिर्डी पोलीस तपास करत आहेत. प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. पोलीस त्यांचा जबाब नोंदवून घेत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरात यांच्याशी प्रतिभा चाकणकर त्यांचे काय संबंध आहेत? आणि या व्यवहारांमागील सत्य काय आहे? हे स्पष्ट होणार आहे. प्रतिभा चाकणकर यांच्या माहितीमुळे पोलिसांच्या तपासाला आणखी वेग येणार आहे. याप्रकरणात अधिक तपास शिर्डी पोलिस करत आहे.





