दिल्ली : विमानतळावर मोठा अपघात टळला आहे. थेट दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले गेले. त्यानंतर प्रवाशांना तातडीने विमानातून बाहेर काढण्यात आले.
दिल्ली विमानतळावर एक मोठा विमान अपघात होताहोता टळला आहे. दोन विमानांच्या पंखांची टक्कर झाली आहे. या धडकेनंतर, सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आणि विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली. स्पाईसजेट आणि अकासा एअरच्या विमानांच्या पंखांची ही टक्कर झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अकासा एअरचे विमान दिल्लीहून हैदराबादला जात होते.
दिल्ली विमानतळावर एक मोठा विमान अपघात टळला. स्पाइसजेट आणि आकासा एअर या दोन विमानांच्या पंखांमध्ये टक्कर झाल्याने गोंधळ झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणताही प्रवासी किंवा क्रू मेंबर जखमी झाला नाही. घटना टर्मिनल १ जवळ घडली. आकासा एअरचे विमान (QP १४०६ ) दिल्लीहून हैदराबादकडे जाण्यासाठी पुशबॅकनंतर तयार उभे होते. त्याच वेळी लेहहून आलेले स्पाइसजेटचे Boeing ७३७ -७०० विमान टॅक्सी करत होते. टॅक्सींगच्या दरम्यान स्पाइसजेटच्या विमानाने आकासा एअरच्या विमानाला धक्का दिला.
नुकसान किती झाले?
-स्पाइसजेटच्या विमानाच्या उजव्या पंखाचा विंगलेट पूर्णपणे खराब झाला.
-आकासा एअरच्या विमानाच्या डाव्या हॉरिजॉन्टल स्टेबलाइजर ला नुकसान पोहोचले.
-दोन्ही विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात आली आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले.
कंपन्यांचे स्पष्टीकरण
स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले, “आमचे B७३७ -७०० विमान टॅक्सी करत असताना दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाशी टक्कर झाली. यामुळे आमच्या विमानाच्या उजव्या पंखाचा थोडा झुकला आहे. विमान दिल्लीतच रोखण्यात आले आहे.”
आकासा एअरच्या प्रवक्त्याने म्हटले, “दिल्ली ते हैदराबाद फ्लाइट QP १४०६ विमानतळावर उभी असताना दुसऱ्या विमानाने धक्का दिला. उड्डाण रद्द करून विमान पुन्हा पार्किंग बेमध्ये आणण्यात आले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णपणे सुरक्षित आहेत. आम्ही प्रवाशांना दुसऱ्या विमानाने हैदराबादला पाठवण्याची व्यवस्था करत आहोत.”
सध्याची स्थिती
दिल्ली विमानतळ प्रशासन आणि दोन्ही एअरलाइन्सने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. दोन्ही विमानांच्या तांत्रिक तपासणीसाठी तज्ज्ञांची टीम बोलावण्यात आली आहे. ही घटना विमानतळावरील ग्राउंड ऑपरेशन्स आणि टॅक्सींग प्रक्रियेदरम्यान घडली असून, त्यामागील कारणे शोधण्यात येत आहेत. कोणतीही जीवितहानी न झाल्याने ही घटना मोठ्या अपघातापासून वाचली, मात्र दोन्ही विमानांना मोठे नुकसान झाल्याने उड्डाण वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.





