जनगणनेमध्ये लिंगायत बांधवांनी धर्माच्या रकान्यात हिंदू ऐवजी लिंगायत अशीच नोंद करावी; लिंगायत धर्मगुरू जनबसवनंद स्वामी यांचे आवाहन

SHARE:

बंगळुरू – सध्या देशभरात आगामी जनगणेची प्रक्रिया सुरू झाली असून काही राज्यांमध्ये जनगणना सुरू आहे. केंद्र सरकार मुस्लिम वगळले तर सर्वांची हिंदू म्हणून जनगणना करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र याला अनेकांचा विरोध आहे. अनु.जातीतील बौद्ध समाजील लोक जनगणनेत आपली नोंद हिंदू ऐवजी बौद्ध म्हणून करण्याचे आवाहन करत आहेत. असेच आवाहन आता लिंगायत समूहातील धर्मगुरू देखील करत आहेत. जनगणनेमध्ये लिंगायत बांधवांनी धर्माच्या रकान्यात हिंदू ऐवजी लिंगायत अशीच नोंद करावी, असे आवाहन लिंगायत समाजातील धर्मगुरू आणि बंगळूर धर्मपिठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामी यांनी समाजबांधवांना केले आहे.

बंगळूर धर्मपिठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामी यांनी दावा केला आहे कि हिंदू हा धर्म नसून वैदिक धर्माला हिंदू म्हटले जाते. भारतात हिंदू धर्माला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे केंद्र सरकारने सुरू केलेल्या जनगणनेमध्ये लिंगायत बांधवांनी धर्माच्या रकान्यात हिंदू न लिहिता फक्त लिंगायत धर्म अशीच नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
जनबसवनंद स्वामी यांनी दावा केला आहे कि हिंदू धर्म अस्तित्वात नाही, हिंदू हा मूळ शब्द किंवा धर्म नसून तो नंतरच्या काळात प्रचलित झाला आहे. हिंदू धर्म लिहू नका कारण हिंदू धर्मच नाही, वैदिक धर्माला, हिंदू म्हटलं जातं म्हणून हिंदू हा धर्म नाही. त्यामुळे जनगणनेत हिंदू शब्द लिहू नका असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जनबसवनंद स्वामी म्हणाले की भारतात जैन, बौद्ध आणि सिख हे मान्यता मिळालेले तीन धर्म आहेत. ब्रिटिशांच्या काळात लिंगायत धर्माला मान्यता होती. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर लिंगायत धर्माची मान्यता गेली. त्यामुळे लिंगात धर्माला स्वातंत्र्य मान्यता मिळावी यासाठी जनगणनेमध्ये हिंदू ऐवजी लिंगायत असे लिहावे. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, लिंगायत हिंदू नाहीत, असा मोठा दावा करत त्यांनी आगामी जनगणनेत धर्माच्या चौकटीत हिंदू ऐवजी लिंगायत अशी नोंद करण्याचे आवाहन लिंगायत बांधवाना केले आहे.

जसा भारतात जन्मलेल्या जैन, शीख आणि बौद्ध धर्माला मान्यता आहे, तशीच मान्यता लिंगायत धर्माला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. लिंगायत धर्माच्या मागणीसाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृती यात्रा काढणार असल्याचे जनबसवनंद स्वामी यांनी स्पष्ट केले.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment

अधिक वाचा