​दुर्दैवी वास्तव: रुग्णवाहिका किंवा स्ट्रेचर मिळेना; आजारी आईला खांद्यावर उचलून नेण्याची मुलावर वेळ

SHARE:

मध्य प्रदेश – भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये विकासाचे मोठं- मोठे दावे केले जातात. मात्र जमिनी स्तरावर काही वेगळीच स्थिती आहे. यावर्षीच्या फेबु्रवारी महिन्यात मध्य प्रदेशातील गुना येथे स्ट्रेचर न मिळाल्यामुळे एका मुलाला आपल्या आजारी वृद्ध वडिलांना खांद्यावर उचलून रुग्णालयात न्यावे लागले होते. आता अशीच एक घटना ओडिशातून समोर आली आहे. येथे स्टेªचर न मिळाल्याने मुलाला आपल्या आजारी आईला खांद्यावर घेऊन जावे लागले. बारीपाडा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हा प्रकार घडला.

प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, मिळालेल्या माहितीनुसार, मयूरभंज जिल्ह्यातील शालाबनी गावात राहणाऱ्या दामिमानी पात्रा यांना ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने डॉक्टरांनी त्यांना चेस्ट स्कॅन करण्याचा सल्ला दिला. मात्र मागणी करूनही महिलेला स्कॅनिंग सेंटरपर्यंत नेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने स्ट्रेचर आणि व्हीलचेअर उपलब्ध करून दिले नाही. अखेर नाईलाज झाल्याने दामिमानी यांचा मुलगा धनेश्वर पात्रा याने आईला खांद्यावर उचलून स्कॅनिंग सेंटर गाठलं.

ही घटना रुग्णालयाच्या मेडिकल वॉर्डच्या आवारात घडली आणि ती कॅमेऱ्यात कैद झाली, ज्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे लक्ष वेधले गेले. धनेश्वर पात्रा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि नंतर त्यांना जवळच्या निदान केंद्रात चेस्ट स्कॅन करून घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.

धनेश्वर पात्रा यांनी आरोप केला की बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही, त्यांच्या आईला तपासणीसाठी नेण्याकरिता रुग्णालय प्रशासनाने कोणतेही स्ट्रेचर आणि व्हीलचेअर उपलब्ध करून दिले नाही. कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे आणि तपासणीला विलंब होण्याच्या भीतीने, त्याच्याकडे आपल्या आईला चेस्ट स्कॅन करण्यासाठी जवळच्या केंद्रापर्यंत खांद्यावर घेऊन जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असा दावा त्यांनी केला. मात्र रुग्णालय प्रशासनाने सव आरोप फेटाळून लावले.
माहित असावे गेल्या फेबु्रवारी महिन्यात भाजप शासित मध्य प्रदेशातील गुना येथे असाच प्रकार समोर आला होता. स्ट्रेचर न मिळाल्याने एका मुलाला आपल्या आजारी वृद्ध वडिलांना खांद्यावर उचलून रुग्णालयात न्यावे लागले होते.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.

Leave a Comment