बीड – पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून तरुणाची हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून 2 जणांना अटक करण्यात आली आहे. बीडमधील एका मृत तरुणाने मित्रांसोबत बाहेरगावी जात असल्याचे कुटुंबाला सांगितले. आणि दोन दिवसानंतर त्याचे प्रेत रेल्वे रुळावर सापडले आहे. त्यामुळे त्याने स्वतःचे जीवन संपवल्याची चर्चा सुरू होती. बीड जिल्ह्यातील परळी येथे एका 36 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह रेल्वे रुळावर सापडला आहे. परळीच्या संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्या किंवा रेल्वे अपघात असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात होता.
मात्र, बीड पोलिसांनी कौशल्याने तपास करत 48 तासांच्या आत या भीषण हत्याकांडाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. केवळ पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कट रचून हत्या करणार्या दोन मित्रांना अटक केली आहे. तोहीद पठाण वय 36 असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो तरूण परळी शहरातील सरदारनगर भागातील रहिवासी होता. या प्रकरणात पोलिसांनी त्याचेच जवळचे मित्र ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांना अटक केली आहे. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूण तोहिद याने आपल्या कुटुंबाला मी मित्रांसोबत बाहेरगावी जात असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर 2 दिवस त्याचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. दोन दिवसांनंतर अचानक परळीतील लेंडेवाडी शिवारात असलेल्या रेल्वे रुळाच्या पटरीवर तोहिदचा मृतदेह सापडला आहे. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात सुरुवातीला घटनास्थळाची परिस्थिती पाहता हा रेल्वे अपघात किंवा आत्महत्येचा प्रकार असावा असे चित्र दिसत होते. परंतु, परळी पोलिसांना हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आला आहे.
पोलिसांनी गुप्त माहिती मिळवून तपास केला आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारे अफझलचे जवळचे मित्र ऋषिकेश फड आणि गौरव व्यास या दोघांना अटक केली आहे. सुरुवातीला या दोन्ही आरोपींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलचे तांत्रिक माहिती मिळाल्यावर पोलिसांचा संशय अधिक वाढला आहे. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी जेव्हा दोन्ही संशयित आरोपींना पकडले तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांचा मृत अफझलसोबत पैशांच्या देवाणघेवाणीवरून जुना वाद सुरू होता.
याच पैशांच्या कारणावरून दोघांनी अफझलचा काटा काढण्याचा पूर्वनियोजित कट आखला होता. बाहेरगावी नेण्याच्या बहाण्याने दोघांनी अफझलला गाठले. आणि निर्जन स्थळी नेऊन त्याच्या डोक्यात दगडाने जबर मारहाण करून त्याची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर हा खून नसून अपघात किंवा आत्महत्या आहे असे दाखवण्यासाठी 2 आरोपींनी मिळून अफझलचा मृतदेह लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळावर आणून फेकला आणि तिथून पळ काढला आहे. बीड पोलिसांनी 2 दिवसांत या गुन्ह्याचा भांडाफोड केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे परळी शहरात हत्याकांडाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणात अधिक तपास बीड पोलिस तपास करत आहेत.
Author: विवेक गंगाधरराव राऊत
Cheif Editor, Rayat Rakshak News, Maharashtra.






