अमरावती : शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या धडाडीच्या कार्यामुळे अल्पवधीतच लोकप्रिय झालेले तरुण नेतृत्व तथा रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र चे अमरावती जिल्हा प्रतिनिधी श्री. आकाश रमेशराव दानखडे यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने अमरावती जिल्ह्यासाठी ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ (Special Executive Officer – S.E.O.) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मोठ्या शासकीय बहुमानासोबतच, भारतीय जनता पक्षानेही त्यांच्या पक्षनिष्ठेची व कामाची दखल घेत त्यांची ‘संत गाडगे बाबा मंडळ, अमरावती’ च्या ‘महामंत्री’ या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती जाहीर केली आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे अमरावतीच्या युवा वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
लोकसंपर्क आणि अविरत जनसेवेचा सन्मान :
आकाश दानखडे हे गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती शहर व परिसरात क्रीडा, शिक्षण आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने आघाडीवर राहिले आहेत. समाजातील सर्वसामान्य आणि तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडवणे, शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवणे ही त्यांची कामाची पद्धत राहिली आहे. तसेच त्यांनी मागील पाच वर्षात सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र चे अमरावती जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्य केले आहे. सतत जनतेचे प्रश्न आपल्या लेखणीतून मांडण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या याच दांडग्या जनसंपर्काची आणि अविरत सेवेची दखल घेऊन शासनाने त्यांना थेट जनतेचे प्रश्न सोडवण्याचे अधिकार देणारे ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ पद बहाल केले आहे.
युवा संघटन अधिक मजबूत होणार:
भाजपमधील त्यांच्या सक्रियतेची आणि संघटन कौशल्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्या खांद्यावर ‘महामंत्री’ पदाची मोठी धुरा सोपवली आहे. या नियुक्तीमुळे संत गाडगे बाबा मंडळ परिसरात भाजपचे संघटन अधिक मजबूत होईल आणि मोठ्या संख्येने नवीन तरुण वर्ग पक्षाशी जोडला जाईल, असा विश्वास पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या केवळ कॉलनी येथील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“शासन आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला मी पूर्णपणे पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन. अमरावतीकरांचे प्रश्न तातडीने सोडवून, शेवटच्या घटकापर्यंत न्याय व विकास पोहोचवणे हेच माझे मुख्य ध्येय असेल.”
— आकाश रमेशराव दानखडे, अमरावती.
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.





