अमरावती – डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय व आश्रीत अंध कर्म शाळा, जेल कॉर्टरसमोर, वडाळी रोड, अमरावती येथील विद्यावती श्रीवास्तव सदन सभागृहात दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष निलेश जामठे व प्रदेश सचिव अनिल कानडे नाशिक,उपेक्षित समाज महासंघ, वऱ्हाड विकास व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड, श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा. अनिल भागवतकर व सदस्य रमेश भटकर, महानायक संघटनेचे अध्यक्ष मा. सुरेश मेश्राम, आदिवासी पारधी विकास परिषद महाराष्ट्रचे राज्य सचिव मा. शिवलाल पवार, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद महाराष्ट्रचे राज्य सचिव ॲड. प्रभाकर वानखडे, मरार माळी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष रामकुमार खैरे, कॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना विदर्भ अध्यक्ष, अलुतेदार बलुतेदार विमास समन्वयक समितीचे सहसचिव सुभाष शिंदे, माजी पोलीस कारागृह अधिक्षक कमलाकर घोंगडे, डॉ.नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाचे वसतिगृह अधिक्षक प्रवीण अवसरमोल तथा आश्रीत अंध कर्म शाळेचे वसतीगृह अधिक्षक मोसेस लव्हाळे या संस्था व संघटनांनी साहित्यिक व समाजप्रबोधनकर्ते प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांच्या पासष्टी निमित्त अभिष्टचिंतन शॉल, पुष्पगुच्छ, वृक्ष व प्रा. प्रवीण बनसोड लिखित विचारपुष्प पुस्तक देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी प्रा. अरुण बुंदेले यांनी सर्व अंध विद्यार्थ्यांना नॅपकीन व अंध विद्यालयाला सिलिंग फॅन भेट देऊन पासष्टी साजरी केली.

“प्रा. अरुण बुंदेले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य युवापिढीला प्रेरणादायी”
– प्रा. श्रीकृष्ण बनसोड
अध्यक्षीय भाषणात प्रा. श्रीकृष्ण बनसोड म्हणाले की, “प्रा. बुंदेले यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य हे युवा पिढीला प्रेरणा देणारे आहे. त्यांनी विद्यालयाला मंदिर व विद्यार्थ्यांना दैवत समजून त्यांच्यावर जे सुसंस्कार केले ते आजही अनुकरणीय आहेत. साहित्यक्षेत्रात आज ते अभंगकार म्हणून ओळखले जात आहेत. ‘अभंग तरंग’ या त्यांच्या प्रकाशित झालेल्या अभंगसंग्रहातून हे सिद्ध झाले आहे.” असे विचार अध्यक्षीय भाषणातून प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांनी व्यक्त केले.

“प्रा. बुंदेले सर समाजातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व”
– मा. निलेश जामठे
“समाजातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे प्रा.बुंदेले सर. त्यांनी फक्त विद्यार्थ्यांनाच घडविले नाही तर समाजप्रबोधनातून समाजसुधारणा करण्याचे त्यांचे कार्य आजही सुरूच आहे.” असे विचार प्रमुख अतिथी निलेश जामठे यांनी व्यक्त केले.

“प्रा. बुंदेले यांचे समाजजागृतीचे कार्य महत्त्वपूर्ण”
– मा. अनिल कानडे
“आजही समाजाला प्रबोधनाची गरज आहे कारण जर समाजाची प्रगती करायची असेल तर समाज जागृत होणे आवश्यक आहे. हेच महत्वपूर्ण कार्य प्रा. बुंदेले आपल्या लेखणीतून आणि वाणीतून करीत आहेत.” असे विचार प्रमुख अतिथी अनिल कानडे यांनी व्यक्त केले.

“प्रा.बुंदेले यांचे व्यक्तिमत्त्व समाजासाठी प्रेरक.”
– ॲड. प्रभाकर वानखडे
“आज प्रा. बुंदेले यांनी बहुजन समाजामध्ये विविध थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त दिलेल्या भाषणातून समाजामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. या समाजासाठी प्रेरक असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे मी अभिष्टचिंतन करतो.” असे विचार प्रमुख अतिथी ॲड. प्रभाकर वानखडे यांनी व्यक्त केले.

“प्रा. अरुण बुंदेले विद्यार्थ्याचे मार्गदर्शक”
– शिवलाल पवार
“प्रा. अरुण बुंदेले यांनी विद्यार्थ्यांना सेवानिवृत्तीच्या अगोदर जसे घडविले तसेच आजही अनेक शाळा कॉलेज मध्ये शैक्षणिक प्रबोधन मालेच्या सादरीकरणातून घडवित आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे विद्यार्थ्यांचे ते मार्गदर्शक आहेत.” असे विचार प्रमुख अतिथी शिवलाल पवार यांनी व्यक्त केले.

“प्रा. बुंदेले साहित्य संमेलनातून प्रबोधन करणारे व्यक्तिमत्त्व”
– कमलाकर घोंगडे
“आजपर्यंत अनेक साहित्य संमेलनातील परिसंवाद व कवीसंमेलनातून प्रबोधन करण्याचे कार्य प्रा. बुंदेले यांनी केलेले आहे. त्यांच्या प्रकाशित साहित्यातून सुद्धा त्यांनी हे प्रबोधनाचे कार्य केलेले आहे व आजही करीत आहेत.” असे विचार प्रमुख अतिथी कमलाकर घोंगडे यांनी व्यक्त केले.

“विद्यार्थ्यांच्या सत्कारातून त्यांच्यात अभ्यासाची प्रेरणा निर्माण करणारे व्यक्तिमत्व.”
– सुरेश मेश्राम
“कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान द्वारे प्रा. बुंदेले यांनी आजपर्यंत दहावी बारावीतील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना आई-वडिलांच्या नावे स्मृती पुरस्कार सन्मानपत्र, रोख रक्कम व पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. या सत्कारामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची निश्चितच प्रेरणा निर्माण होते.अशा विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्वाचे पासष्टीनिमित्त मी अभिष्टचिंतन करतो.” असे विचार प्रमुख अतिथी सुरेश मेश्राम यांनी व्यक्त केले.

“प्रा. बुंदेले स्वतःचा वाढदिवस समाजसेवेसाठी अर्पण करणारे व्यक्तिमत्त्व”
– रामकुमार खैरे
“स्वतःसाठी सर्वच जगतात पण इतरांसाठी जगणारे त्यांना मदत करणारे समाजात फार कमी असतात. अशाच पैकी एक सामाजिक बांधिलकी स्वीकारलेलं व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. बुंदेले आहेत. दरवर्षी ते स्वतःचा वाढदिवस समाजसेवेसाठी अर्पण करतात. आज त्यांनी येथे अंध मुलांच्या जीवनात त्यांना भेट वस्तू देऊन प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यापासून निश्चितच आपण प्रेरणा घेतली पाहिजे. याच कार्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो, ही शुभेच्छा ॥” असे विचार प्रमुख अतिथी रामकुमार खैरे यांनी व्यक्त केले.

“प्रा. बुंदेले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याने मी भारावलो.”
– मोसेस लव्हाळे
“प्रा. अरुण बुंदेले सर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी अनेक संघटना संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी या ठिकाणी आले. सरांचे ६५ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले, सत्कार केला. सरांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वावर विचार व्यक्त केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या. हे सर्व बघून मी खूप भारावलो, मला खूप आनंद झाला. जर आपण इतरांवर प्रेम केले तर आपल्यावर ते प्रेम करतात हे या सत्काराने सिद्ध झाले. प्रा. बुंदेले हे एक दाणी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी दिलेली भेट आम्ही मनापासून स्वीकारली. असेच कार्य पुढेही त्यांच्या हातून घडो यासाठी जन्मदिवशी मी सरांना शुभेच्छा देतो.” असे विचार प्रमुख अतिथी मोसेस लव्हाळे यांनी व्यक्त केले.
“सामाजिक बांधिलकीची आज समाजाला गरज”
– सत्कारमूर्ती प्रा. अरुण बुंदेले
“उपेक्षित समाज महासंघ, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था, महानायक संघटना, आदिवासी पारधी विकास परिषद, मरार माळी बहुउद्देशीय संस्था, अलुतेदार बलुतेदार विकास समन्वयक समिती, डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण संघ या व इतर अनेक पुरोगामी संघटनांनी जो आज माझा माझ्या वाढदिवसानिमित्त सन्मानपूर्वक सत्कार केला त्याबद्दल मी सर्व संघटनांचे, संघटनांच्या अध्यक्षांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि सर्वांचेच आभार मानतो. यापुढेही असेच सामाजिक व शैक्षणिक कार्य वृद्धिंगत करण्याचा मी सतत प्रयत्न करेल. सामाजिक बांधिलकीची समाजाला आज फार मोठी गरज आहे असे मला वाटते.” असे विचारसत्कारमूर्ती प्रा. अरुणा बुंदेले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन अँड. प्रभाकर वानखडे तर आभार सुभाष शिंदे यांनी मानले. याप्रसंगी बबनराव तांबे, अनिल माहोरे, सुनिल भागवतकर व विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य तसेच अंध विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, आश्रित अंध कर्म शाळेचे वसतिगृह अधिक्षक मोसेस लव्हाळे सर, डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाचे वसतिगृह अधिक्षक प्रवीण अवसरमोल सर, विशेष शिक्षक व्यंकटेश मदीकुंटावार सर, काळजीवाहक जगन राठोड, काळजीवाहक भानुदास तायडे, मदतनीस चंद्रशेखर कळंबे, स्वयंपाकी हेमलता कापसे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने झाली.
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.






