स्वातंत्र्याचे अमृतपर्व…

SHARE:

भारताचे पर्व..

कुणी जैल अन् फासावरती
हसता गेलेय वीर जवान,
बाजी जीवाची लावूनी लढले
क्रांतीवीर देशाचे तुफान,

स्वातंत्र्याची गीते गाऊनी
देश भक्तीने पेटविले रान,
भू मातेचे उपकार जागुनी
देह आपुला केला दान,

सुखदेव, भगतसिंग, राजगुरू
या मातेचे पुत्र महान,
अमर होऊनिया जगी जाहले
जन्मो जन्मीचे कीर्तीमान,

ज्वाला होऊनी वीर उठले
घेऊनी तळहातावर प्राण,
जिंकू किंवा मरूही ब्रीद हे
स्वातंत्र्याची घेतली आणं,

सुमधुर सुमंगल पवित्र दिनी
स्वातंत्र्याचे अमृतपर्व,
जिकडे तिकडे आनंदी सोहळे
तोची आमुचा मनात गर्व….!

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

लेखक –
संजय अण्णाजी देशमुख
मु. पळसखेड, जि. अमरावती.
संपर्क – ९४२१७८९००९

संजय अण्णाजी देशमुख
Author: संजय अण्णाजी देशमुख

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, साहित्यिक, मार्गदर्शक, कवी, अभंगकार, पोवाडे रचियेता, सर्वोत्कृष्ट काव्य रचनेचे राज्य स्पर्धा पुरस्कर्ते आहेत. 'चरे अंतरीचे' हा त्यांचा काव्यसंग्रह २०२३ ला प्रकाशित झालेला असून पुढील दोन काव्य संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयावरील ज्वलंत सडेतोड विचार मांडणारेउत्कृष्ट लेखक आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून साहित्य व वैचारिक लेख, काव्यरचना च्या माध्यमातून सतत आपले विचार जनतेपुढे मांडत असतात..

Leave a Comment