देशात आज जात, धर्म अल्पसंख्याकवाद, बहुसंख्यांक वाद याच गोष्टींना प्राधान्य दिल्या जात आहे. इतर देशांसोबत तुलना केली तर तिथेही अनेक धर्मांचे लोक राहतात. परंतू त्याचा उपयोग राजकारणाशी कधीच करत नाही कारण त्या देशातील लोकांना आपल्या देशाची प्रगती, अखंडता महत्वाची असते. देशात धर्मवाद, जातीवाद, अल्पसंख्याकवाद असा वाद करून देशाला घातक होईल अशी परिस्थिती कधीच निर्माण होऊ देत नाही. म्हणूनच असे वाटते की, लहानातील लहान देश तुलना केली तर आपल्या पेक्षा त्याचा त्यांच्या देशातील असणार्या भौतिक सुवेधेनुसार पुढेच जात आहे.
धर्मवाद व जातीवाद नाहीसा होईल का.?
धर्मवाद आणि जातीवाद हा कोणत्याच देशाला परवडण्यासारखा नसतो. अस्या देशाची प्रगती नसून अधोगतीकडे वाटचाल सुरू असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीवाद आणि धर्मवाद केला असता तर खरोखरच आपल्याला स्वराज्य मिळालं असतं का.? छत्रपतींनी सर्वांचा त्यांच्या अंगी असणार्या कौशल्यानुसार सन्मान केला. म्हणूनच ते स्वराज्याचे छत्रपती झाले आणि जगात त्यांच्या शौर्याची व कर्तव्याची गाथा वाचल्या जाते. त्यांनी बळीराजा आणि स्त्रिया, बालके, कलावंत, साहित्यिक, कर्तबगार यांची विशेष काळजी घेतली. म्हणूनच नियतीने सुद्धा त्यांना साथ दिली.
छत्रपतींच्या देशाची प्रगती होईल का.?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच देशात काय चाललं आहे. हे पाहून सर्व सामान्य माणसाचे मन हेलावून जातं आहे. आजचे आमचे राजे स्वतः मालक समजून प्रजेलाच लुटायला लागले असे चित्र दिसत आहे. आज सर्वसामान्यवर लावलेला कर तर जणू इंग्रजी लूटच वाटत आहे. डाकीनही डाका टाकते एक घर सोडूनच टाकते पण आज सरकारने तर कहरच केला ते कुणालाच सोडू पहात नाही. नागरीकांच्या मुलभूत गरजा शिक्षण, आरोग्य हे सुद्धा कराविना सोडले नाही आणि आपल्या राजकीय स्थैर्यासाठी अनाठायी अनेक कुचकामी योजना चालू करून लोकांना असे छंड केले की त्यांनी कधी महागाई, रोजगार, आवश्यक सुविधा या विषयी आवाजच उठवला नाही पाहिजे अशी परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे. लाडकी बहिण, भांडे वाटप अश्या प्रकारच्या अनेक कुचकामी योजना स्वराजकीय हित डोळ्यासमोर ठेऊन तुम भी खावो हम भी खाते खरंच असल्याने देशाचा विकास खरोखरच होणार आहे का ? सर्वसमावेशक सर्वसमान जनहितार्थ योजना राबविल्या समाजाची उन्नती होईल पण स्वहितार्थ राबविल्या तर देशाची खरोखरच प्रगती होईल का.?
बळीराजाला न्याय मिळेल का.?
भारत हा कृषिप्रधान देश आहे. हा बळीराजा राबराब राबतो पण त्यांच्या मालाला आपण भाव काय देतो त्याचा उत्पादन खर्च काय असतो त्याची मेहनत काय आहे. त्याचा माल निघाला की आपले आयात धोरणं राबवून त्यांच्या मालाच्या किमती पाडणे हे धोरण कितपत योग्य आहे. उद्योगपती आपल्या मालाची किंमत ठरवू शकतो पण शेतकरी नाही अशी छडयंत्री व्यवस्था सरकारने सुरुवात पासूनच करून ठेवली आहे. ह्या अन्नदात्या बळीराजाचा जेव्हा विकास होईल तेव्हाच या देशाचा विकास होऊ शकते. आज शेत अवजारे, बियाने, औषधे यावर तरी जीएसटी चे भूत नको. आज कित्येक बळीराजे आत्महत्या करतात का? कारण त्यांच्या समोर त्याशिवाय पर्यायच नसतो. आज तर सरकार मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारे वाटते.
भ्रष्टाचाराला आळा बसेल का.?
भ्रष्टाचार हा देशाच्या प्रगतीला तेवढाच बाधक आहे. जर राजाच भ्रष्ट असेल तर प्रशासन कुठे निकोप राहणार. राजा भ्रष्ट असल्यामुळे प्रशासनावर तो नियंत्रण ठेवून शकत नाही. अशी ज्या देशाची परिस्थिती असते तो देश प्रगती ऐवजी अधोगतीकडेच जाते. देशाला पोखरणारी किड ही भ्रष्टाचारच आहे. ही कीड जिथेही लागली तो देश आतूनच खोकला बनत जातो आणि ही एक लागलेली चटक सहजासहजी जात नाही त्यावर जालीमच औषध मारावं लागते.
उदा. तुकाराम मुंढे सारखे अधिकारी तयार हो अशी जनता वाट पहात आहे. जनता आज या सरकारी अनैतिक धोरणाला कंटाळली आहे.
तो पर्यंत जय शिवराय…!
लेखक –
संजय अण्णाजी देशमुख
मु. पळसखेड, जि. अमरावती.
संपर्क – ९४२१७८९००९
Author: संजय अण्णाजी देशमुख
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, साहित्यिक, मार्गदर्शक, कवी, अभंगकार, पोवाडे रचियेता, सर्वोत्कृष्ट काव्य रचनेचे राज्य स्पर्धा पुरस्कर्ते आहेत. 'चरे अंतरीचे' हा त्यांचा काव्यसंग्रह २०२३ ला प्रकाशित झालेला असून पुढील दोन काव्य संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयावरील ज्वलंत सडेतोड विचार मांडणारेउत्कृष्ट लेखक आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून साहित्य व वैचारिक लेख, काव्यरचना च्या माध्यमातून सतत आपले विचार जनतेपुढे मांडत असतात..






