अमरावती : “आपल्या सततच्या प्रेरणेमुळेच आम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगतीची दिशा मिळते. वाढदिवसानिमित्त आपले अभिष्टचिंतन व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा!” असे प्रतिपादन अध्यक्ष प्राचार्य श्री सुधीरकुमार सवाई यांनी केले. ते विदर्भ समाजकल्याण व बहुउद्देशीय संस्था येरला, ता. मोर्शी, जि. अमरावती द्वारा संचलित जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मोर्शी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त सहाय्यक शिक्षिका कु. ज्योती पुंडलिकराव पद्मने (बुंदेले) यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त दि. ७/९/२०२६ रोजी संपन्न झालेल्या अभिष्टचिंतन प्रसंगी अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त कु. ज्योती पद्मने (बुंदेले) यांनी शाळेला पुस्तके भेट देऊन साजरा केला वाढदिवस

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. सुधीरकुमार सवाई, प्रमुख अतिथी श्री. शैलेश ठाकरे सर, प्रा. आर. जी. कोटांगळे, प्रा. डी. बी. जावळे होते. अध्यक्ष,प्रमुख अतिथी व सर्व शिक्षक – शिक्षिकांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. कु. ज्योती पुंडलिकराव पद्मने (बुंदेले) यांनी शाळेला विविध विषयावरील व चरित्रात्मक पुस्तके सस्नेह भेट देऊन स्वतःचा ५८ वा वाढदिवस साजरा केला.


याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. सुधीरकुमार सवाई, प्रमुख अतिथी श्री. शैलेश ठाकरे सर, प्रा. आर. जी. कोटांगळे, प्रा. डी. बी. जावळे तसेच कु. एस. वाय. अजमिरे(शिरभाते), श्री. ए. एम. गावंडे, कु. एस. जी. गाडगे, प्रा. कु. यु. बी. ढोकणे, कु. ढोक, कु. एस. एस. नाखले व शिक्षकेतर कर्मचारी श्री. वेदांत भोगे, श्री. डी. ए. तंतरपाळे, श्री. एम. एन. गोमकाळे, श्री. एन. जी. चौधरी व तथा शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कु. ज्योती पद्मने ( बुंदेले ) मॅडमचे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले आणि निरामय व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचलन कु. व्ही. ई. कानबाले व आभार श्री. बी. एन. भारती सर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहारने झाली.
Author: आकाश रमेशराव दानखडे
लेखक अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी असून सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे चांगले वलंय आहे. मागील ८ वर्षांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. २०२६ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून सन्मानित केले आहे.






