दि. ११ सप्टेंबर २०२६ ला असलेला ‘तान्हा पोळा’ हा सण प्रामुख्याने विदर्भात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मोठ्यांच्या पोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी लहान मुले लाकडाचे नंदीबैल सजवून हा सण साजरा करतात. तान्ह्या पोळ्यानिमित्त साहित्यिक व कवी प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांची ‘तान्हा पोळा’ ही कविता वाचकांसाठी येथे प्रकाशित करीत आहोत..
तान्हा पोळा –
लाकडाचा आज नंदीबैल छान रंगविला ।
लहान मुलांचा बघा तान्हा पोळा आला ॥
बाशिंग बांधती कपाळी गळ्यात माळ ।
बाळांच्या जीवनातला आनंदाचा काळ ॥
बैल करी घेऊनी मुले घरोघरी फिरती ।
खाऊ नि पैसे घेऊन आनंदात नाचती ॥
मुलांसाठी आमुच्या लाडका हा सण ।
बाळ गोपाळांचे बघा कसे रमले मन ॥
मुलांचा रांगेत तान्हा पोळा सजला छान ।
लाकडाच्या नंदिबैलाने मुलांचा सन्मान ॥
मुलांचा तान्हा पोळ्याचा सण आहे थोर ।
तान्हा पोळ्यात नाचती लहान अन् थोर ॥
तान्हा पोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ।
बाळगोपाळांना मोदमय मनस्वी सदिच्छा ॥
लेखक –
प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
संत कबीर कवीराज पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व कवी, अमरावती.
संपर्क – ८०८७७४८६०९
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.






