आले आले गणराया….
आले आले गणराया
घरा झाले आगमन,
बैसताची मखराती
येई सुख समाधान,
कानी कवच कुंडल
पायी सोनियांचा वाळा,
मन सुखावती जना
पाहुनिया शिव बाळा,
वक्रतुंड त्याची सूंड
सूप वाटतिया कान,
मूख गजाचे आनन
दंत शस्त्रही समान,
असे सुखाचाही दाता
दुःख करती हरण,
क्षीणभाग क्षमतोय
तया स्पर्शता चरण,
लाल फुल आवडीची
गळा माळ दुर्व्याची,
असे वाहन मूषक
गोडी त्यास मोदकाची,
विद्या धनाचा मालक
दूर पळती अज्ञान,
जया आशिष गणेशा
दुःख लागती काठानं,
लेखक –
संजय अण्णाजी देशमुख
मु. पळसखेड, जि. अमरावती
संपर्क – ९४२१७८९००९
Author: संजय अण्णाजी देशमुख
लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, साहित्यिक, मार्गदर्शक, कवी, अभंगकार, पोवाडे रचियेता, सर्वोत्कृष्ट काव्य रचनेचे राज्य स्पर्धा पुरस्कर्ते आहेत. 'चरे अंतरीचे' हा त्यांचा काव्यसंग्रह २०२३ ला प्रकाशित झालेला असून पुढील दोन काव्य संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयावरील ज्वलंत सडेतोड विचार मांडणारेउत्कृष्ट लेखक आहेत. विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुद्धा ते सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून साहित्य व वैचारिक लेख, काव्यरचना च्या माध्यमातून सतत आपले विचार जनतेपुढे मांडत असतात..






