कर्मवीर भाऊराव पाटील : शिक्षणाची ज्योत पेटविणारा कर्मयोगी

SHARE:

‘कमवा आणि शिका’ चा मंत्र देत रयतेच्या लेकरांसाठी आयुष्य वेचणाऱ्या महामानवाची जयंती

 

२२ सप्टेंबर १८८७ रोजी कुंभोज येथे जन्मलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनाला नवी दिशा दिली. त्यांचे मूळ गाव ऐतवडे बुद्रुक. वडील पायगोंडा पाटील आणि आई गंगाबाई. घरात धार्मिक व सामाजिक संस्कार असले, तरी पुढे भाऊरावांनी जातिभेद, अज्ञान आणि सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्षाचा मार्ग स्वीकारला.

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडला. गरीबाच्या मुलालाही शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे, या ध्यासातून त्यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.

त्यांचा ‘कमवा आणि शिका’ हा विचार केवळ शिक्षणाचा प्रयोग नव्हता, तर तो स्वाभिमान आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश होता. विद्यार्थ्यांनी श्रम करावा, स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि शिक्षण घ्यावे, हा त्यांचा आग्रह होता. विविध जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांना एकत्र राहण्याची व शिकण्याची संधी देऊन त्यांनी समतेचा प्रत्यक्ष प्रयोग घडवून आणला.

गाडगेबाबांच्या शब्दांत भाऊरावांचे मोठेपण
कर्मवीरांच्या कार्याला संत गाडगेबाबांचीही मनापासून साथ होती. १९३९ मध्ये साताऱ्यातील श्री सयाजीराव हायस्कूलच्या कार्यक्रमानंतर गाडगेबाबांनी कीर्तनातून लोकांना मुलांना शिकविण्याचे आणि भाऊरावांच्या शैक्षणिक कार्याला मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत लोकांनी भाऊरावांच्या कार्यासाठी मदत केली, असा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या प्रकाशित साहित्यात आढळतो.

याच प्रसंगाची एक लोकप्रिय आठवण अशी सांगितली जाते तसेच मी काही महिन्यापूर्वी माझ्या कृष्णधवल व्हिडिओ क्लिप पाहण्याचा योग आला त्यात संत गाडगेबाबा म्हणतात .
“लोकहो, पाया पडायचे असेल तर भाऊराव पाटलांच्या पाया पडा; पंजाबराव देशमुखांच्या पाया पडा; गरीबांच्या लेकरांसाठी शिक्षणाची आणि राहण्याची सोय करणाऱ्या या कर्मयोग्यांच्या कार्याला साथ द्या.” भाऊरावांनी आयुष्यभर संपत्ती नव्हे, तर शिक्षित माणसांची संपत्ती निर्माण केली. त्यांनी शाळा उभारल्या, वसतिगृहे उभी केली आणि हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा दिली. म्हणूनच त्यांना लाभलेली ‘कर्मवीर’ ही उपाधी त्यांच्या जीवनकार्याचे साआज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करताना एक प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे—आपल्या आसपासच्या एखाद्या गरजू मुलाच्या शिक्षणासाठी आपण काय करू शकतो?

कारण कर्मवीरांना खरी आदरांजली त्यांच्या प्रतिमेला हार घालण्यात नाही, तर शिक्षणाची ज्योत एका गरजू घरापर्यंत पोहोचविण्यात आहे.

“भाऊरावांनी संस्था उभारली नाही;
त्यांनी पिढ्या घडवल्या;
त्यांनी शिक्षण दिले नाही;
त्यांनी समाजाला उभे राहण्याची ताकद दिली.”

कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

 

लेखक –
इंजि. प्रदीप चौधरी, नागपूर.
हेल्थ अँड लाइफ कोच,
H24 FIT CLUB & NUTRI WORLD
संपर्क – ८६६८४६६४३८

इंजि. प्रदीप चौधरी
Author: इंजि. प्रदीप चौधरी

लेखक नागपूर येथील रहिवासी असून अमरावती येथील कृषिदेव खत कारखान्यात कारखाना व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. पेशाने ते यांत्रिकी अभियंता आहे, त्याचबरोबर समाजातील आरोग्य आणि फिटनेस जनजागृतीसाठी ते हेल्थ अँड लाइफ कोच म्हणूनही कार्यरत असून समाजप्रबोधनाचे कार्य सक्रियपणे करतात. साहित्याची आवड असल्यामुळे ते सामाजिक, शैक्षणिक तसेच आरोग्य व जीवनशैली विषयक लेखन नियमितपणे करतात. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक विषयांवर विपुल लेखन केले असून त्यांचे लेख सोशल मीडिया मध्ये सातत्याने प्रकाशित होतात. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते समाजप्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे पार पाडत आहेत. आपल्या प्रभावी आणि विचारप्रवर्तक लेखणीद्वारे ते सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विषयांवरील महत्त्वपूर्ण विचार जनतेसमोर मांडतात. आपले विचार सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून ते नेहमी प्रखरतेने मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा