कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्य विशेष अभंग…

SHARE:

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण पुरस्कार प्राप्त कर्मवीर भाऊराव पाटील यांचा दि. २२ सप्टेंबर २०२६ ला असलेल्या १३९ व्या जयंतीनिमित्त अभंगकार व साहित्यिक प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांच्या स्वलिखित ‘अभंग तरंग’ या काव्यासंग्रहातील ‘कर्मवीर भाऊराव पाटील’ अभंग वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

कर्मवीर भाऊराव पाटील

रयत शिक्षण ।
संस्थेची स्थापना ।।
विद्या बहुजना ।
मिळतसे ।।१।।

भाऊराव एक ।
युग कर्मवीर ।।
तेज दिनकर ।
विद्यार्थ्याचे ।।२।।

ग्रामा नि ग्रामात ।
गंगा शिक्षणाची ।।
रात तिमिराची ।
प्रकाशित ।।३।।

शाळेशाळेतून ।
पेटविल्या वाती ।।
प्रकाशल्या ज्योती ।
झोपडीत ।।४।।

रयत शिक्षण ।
हेच ज्ञानपीठ ।।
हेच विद्यापीठ ।
साताऱ्यात ।।५।।

शाहू नि फुलेंचे ।
समानता तत्त्व ।।
जीवनाचे सत्व ।
कर्मवीर ।।६।।

शाळे नि शाळेत ।
बहुजन गुरू ।।
वंचितांचा तारू ।
उगवला ।।७।।

कर्मवीरांना मी ।
करितो नमन ।।
करांनी वंदन ।
कोटी कोटी ।।८।।

लेखक –
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले
राज्यस्तरीय संत कबीर कवीराज पुरस्कार प्राप्त 
अभंगकार व साहित्यिक, काँग्रेस नगर, अमरावती.
संपर्क : ८०८७७४८६०९

प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
Author: प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले

लेखक एक उत्कृष्ट शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मार्गदर्शक, साहित्यिक, कवी, अभंगकार, समीक्षक, समाजप्रबोधनकर्ते असून अमरावती शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक विषयावरील बारा पुस्तकांचे लेखक असून बावीस पुरस्कारांचे मानकरी आहेत. सोबतच विविध पुरोगामी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत. मागील गेल्या दोन वर्षांपासून ते सा. रयत रक्षक, महाराष्ट्र व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र च्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध विषयांवर लिखाण करून आपले विचार ते जनतेपुढे मांडत असतात.

Leave a Comment

अधिक वाचा