काँग्रेस सोबतचं इंडिया आघाडी चे दिल्ली मधे जोरदार आंदोलन; राहुल गांधी यांचा आक्रमक पवित्रा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामाची मागणी…

SHARE:

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मोहन भागवत यांच्या विरोधात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस पक्ष आणि ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत एक अत्यंत आक्रमक आणि भव्य मोर्चा (सेव्ह डेमोक्रेसी मार्च) काढण्यात आला. संसदेच्या मकर द्वारापासून सुरू झालेला हा मार्च निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच्या दिशेने नेण्यात आला, जिथे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि हजारो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राहुल गांधी यांचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला.

लोकशाही संपवली – राहुल गांधी यांचा आरोप 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, सरसंघचालक मोहन भागवत यांनी ज्ञानेश कुमार चा वापर करून निवडणुका हायजॅक केल्या. याच माध्यमातून लोकशाही संपवली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.  देशातील मुख्य निवडणूक आयुक्त जर लोकप्रतिनिधिना भेटण्यास तयार नसतील, तर ते खूप जास्त घाबरले आहेत. या सर्व गैरव्यवहारात जे जे लोक असतील त्या सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे ही राहुंधी म्हणाले.

पोलिसांनी अडवल्यावर राहुल गांधी थेट बॅरिकेट वर चढून हातात तिरंगा घेऊन देशाचा झेंडा फिरवतांना दिसलें.

 

 

लपून छपून आकाशवाणी भवनात प्रवेश –

संसदभवन कडून निघणारा हा मार्च निवडणूक आयोगाकडे जात असतांना पोलिसांनी बॅरे्केटिंग केली व इंडिया आघाडी च्या 300 हुन अधिक खासदारांना रोखण्यात आले. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना अटक सुद्धा केली परंतु दोघेही बहीण भाऊ पोलिसांना चकमा देऊन लपून छपून आकाशवाणी भवनात प्रवेश केला व एका झाडाखाली जवळपास 2 तासाच्या वर ठिय्या आंदोलन केले.

विवेक गंगाधरराव राऊत
Author: विवेक गंगाधरराव राऊत

लेखक सा. रयत रक्षक व रयत रक्षक न्यूज, महाराष्ट्र. चे मुख्य संपादक असून स्वतः प्रकाशक व मालक आहेत. त्यांना मागील 20 वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व पत्रकारिता क्षेत्रातील मागील 9 वर्षाचा अनुभव आहे. आपल्या लेखणीतून ते नेहमी रयतेचे हित जोपसण्याचे कार्य करतात.

Leave a Comment

अधिक वाचा