
अमरावती – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागताच संपूर्ण महाराष्ट्रभर लगभग सुरू झालेली आहे. प्रत्येक पक्ष आपाआपल्या संघटनेची बांधणी करण्यामध्ये लागलेला आहे. यामध्ये कुठलाही पक्ष मागे राहिलेला नाही. त्याचप्रमाणे सत्तेमध्ये असलेले भारतीय जनता पार्टी सुद्धा लोकसभासारखी कुठेही चूक करण्याच्या मार्गामध्ये नाही. याच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी च्या वतीने संत गाडगेबाबा मंडळ ची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख यांचे मत जाणून घेण्यात आले तसेच सर्व पदाधिकाऱ्यांना कामावर लागण्याचे आदेश देण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे अमरावती शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संत गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष अभिजीत उर्फ छोटू वानखडे यांच्या नेतृत्वात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला प्रामुख्याने अमरावती शहराच्या निरीक्षक किरणताई महल्ले निरीक्षक संजय तिरथकर, शहर सरचिटणीस बादल कुलकर्णी, माजी नगरसेविका सुरेखाताई लुंगारे, माजी नगरसेवक चंदूभाऊ बोमरे, शहर उपाध्यक्ष धीरज बारबुद्धे, माजी नगरसेविका रीता मोकलकर, शाम पाध्ये, मंडळ सरचिटणीस अमोल आगरकर, मंडळ सरचिटणीस आकाश दानखडे, मंडळ सरचिटणीस गणेश खोत, मंडळ सरचिटणीस आकाश जाधव, तसेच संत गाडगेबाबा मंडळातील बूथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.





