नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या घाटात मोठा अपघात, संरक्षण कठडा तोडून इनोव्हा घाटात कोसळली, ५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती…

SHARE:

नाशिक : नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकच्या प्रसिद्ध अशा सप्तश्रृंगी देवीच्या गडाच्या दिशेला जाणाऱ्या घाटात एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या कारमध्ये सर्व भाविक होते. सर्व भाविक हे सप्तश्रृंगी देवीच्या गडावरुन दर्शन घेऊन परतत होते. यावेळी घाटात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. ही कार थेट खोल दरीत कोसळली आहे. त्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. या कारमध्ये नेमकं कोण होतं आणि ते सुरक्षित आहेत का? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी दर रविवारी भाविकांची गर्दी होत असते. भाविक मनोभावे देवीच्या दर्शनासाठी इथे येत असतात. याशिवाय शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने सप्तश्रृंगी गडावर भाविकांची गर्दी असते. अशाचप्रकारे पाच भाविक हे इनोव्हा कारने देवीच्या दर्शनाला गेले होते. ते देवीचं दर्शन घेऊन परतत असताना घाटात मोठी दुर्घटना घडल्याची माहिती आहे.

संरक्षण कठडा तोडून इनोव्हा कार घाटात कोसळल्याची माहिती आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. अपघातग्रस्थांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आली आहे. पण दरी खोल असल्याने बचावकार्यात अडथळा येत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या घटनेनंनतर बचावकार्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही लोकं हे रस्त्यावरुन उभे राहून दरीच्या दिशेला पाहताना दिसत आहेत. खोल दरीत जिथे कार कोसळली आहे तिथे पाच-सहा जण पोहोचलेले दिसत आहेत. त्यांच्याकडून अडकलेली गाडी बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेतील अपघाग्रस्तांना जीव वाचावा यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच कारदेखील बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

अपघात नेमका कसा घडला? त्याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. गाडीचा ब्रेक फेल झाला की भरधाव वेगामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं की तीव्र वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेबाबत प्रशासनाकडून काय माहिती दिली जाते? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

Leave a Comment

अधिक वाचा