रत्नागिरी जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघड, आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल…

SHARE:

गुहागर – रत्नागिरी जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुहागरमध्ये संतापजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीला समुद्रकिनारी नेत दारू पाजली, लैंगिक अत्याचार करत रात्री लॉजवर नेले. याप्रकरणात एका नराधमाला अटक करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला समुद्रकिनाऱयावर नेत नराधमाने मद्य पाजत लैंगिक अत्याचार केला, नंतर रात्री जबरदस्तीने तिला लॉजवर देखील नेल्याचा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुलगी रात्रभर घरी न आल्याने पालकांनी पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार केली.

मात्र दुपारी स्वतःच घरी आलेल्या मुलीची अवस्था पाहून तिच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीला चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी प्रितेश सुर्वे 29 या नराधमाला गुहागर पोलिसांनी अटक केली आहे. गुहागर पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण गुहागरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यात अने कशहरांत अशा लहान मोठया लैगिक अत्याचाराच्या घटना रोज घडत आहे, तरी प्रशासनाने वेळीच जागे होऊन अशा आरोपीवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

Leave a Comment

अधिक वाचा