उत्तरप्रदेशात यमुना एक्स्प्रेसवेवर मोठा अपघात, १३ जणांचा मृत्यू, ४३ जण जखमी…

SHARE:

मथुरा – उत्तरप्रदेशात यमुना एक्स्प्रेस वेवर मोठा अपघात झाला आहे, तर यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे, ४३  जण जखमी झाले आहेत. आगीत जळालेले अवशेष गोळा करून शवविच्छेदनासाठी काळया पिशव्यांमधून रुग्णालयात नेण्यात आले आहे. या अपघातात एका महिलेच्या गळयात काचेचा तुकडा घुसला होता, ती रक्तबंबाळ झाली तरी जळत्या बसची खिडकी फोडून दोन्ही मुलांना बाहेर काढले आणि ती महिला आगीत होरपळून मरण पावली आहे.

पहाटेच्या वेळी पडणाऱ्या दाट धुक्यामुळे यमुना एक्स्प्रेस वेवर अनेक वाहने एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात होऊन आग पसरून १३  जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात ४३  जण जखमी झाले आहेत. अपघातात ८  बस आणि ३  लहान वाहने एकमेकांना धडकली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बस्ती आणि उन्नाव येथील अपघातांत प्रत्येकी ४  आणि मीरत व बाराबंकीतील अपघातांत प्रत्येकी २ जण ठार झाले आहेत.

या अपघातानंतर बसने पेट घेताच पार्वती नावाच्या महिलेने आपल्या दोन मुलांना खिडकीबाहेर काढून त्यांचा जीव वाचवला आहे. मात्र ती तिचा जीव वाचवू शकली नाही. यावेळी तिच्या गळयात काचेचा तुकडा घुसल्याने ती मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन ती कोसळली. तिचा दीर गुलझारी याला रुग्णालयांमध्ये तिचा शोध कुठेही लागला नाही. पोलिसांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक मृतदेह ओळखण्यापलिकडे आहेत. आगीत जळालेले अवशेष गोळा करून शवविच्छेदनासाठी काळया पिशव्यांमधून रुग्णालयात नेण्यात आले आहे. जळालेल्या मृतदेहांचे डीएनए तपासणी करून नातेवाइकांनी दिलेल्या माहितीशी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

पार्वती देवी नावाची महिला तिच्या दोन मुलांसह उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील तिच्या गावी नोएडाला तिचा पती गोविंदला भेटण्यासाठी जात होती. मथुरा येथील शवागाराबाहेर उभ्या असलेल्या दीर गुलझारीच्या म्हणण्यानुसार, प्राची आणि सनी या दोन्ही मुलांनी सांगितले की, त्यांना बाहेर काढत असताना त्यांची आई बसमध्ये बेशुद्ध पडली होती. त्यानंतर शोध घेऊनही काहीही सापडले नाही. चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सांगितले की १३  जणांचा मृत्यू होरपळून झाला आहे. मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटवणे अशक्य होते.

उत्तरप्रदेशात यमुनानगर एक्स्प्रेस वेवरील अपघाताची घटना ही बलदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या अपघातात १३  जणांचा होरपळल्यामुळे मृत्यू झाला आहे. घटनास्थळी केवळ जळलेल्या बसगाड्या आणि कारचे सांगाडे उरले होते. ते रस्त्यावरून हटवण्यासाठी क्रेन मागवण्यात आल्या आहेत. ‘यमुना एक्स्प्रेस वेच्या आग्रा ते नोएडा पट्टयात धुक्यामुळे दिसणे कमी झाल्यामुळे अनेक वाहनांची धडक झाली आहे. यातील काही वाहनांनी पेट घेतला आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे’, असे मथुरेचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक श्लोक कुमार यांनी सांगितले आहे.

मृतांपैकी तिघांची ओळख पटली असून, अखिलेंद्र प्रताप यादव ४४, प्रयागराज, रामपाल, ७५, महाराजगंज, आणि सुलतान अहमद ६२, गोंडा अशी त्यांची नावे आहेत. उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जिल्हा न्यायदंडाधिकाऱी यांनी या अपघाताच्या चौकशीसाठी अपर जिल्हाधिकारी प्रशासन अमरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती 2 दिवसांत अहवाल सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. बलदेव पोलिस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या अपघाताबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली.

Leave a Comment

अधिक वाचा