राज्यात ड्रग्सचे रॅकेट फडणवीस सरकारच्या, मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचले, हेच उद्योग राज्यात येणार आहे का? शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांचा भाजपा सरकारला प्रश्न.?

SHARE:

मुंबई – राज्यात ड्रग्सचे रॅकेट फडणवीस भाजपा सरकारच्या, मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहेत, तर हेच उद्योग राज्यात येणार आहे का? असा शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी राज्यातील भाजपा सरकारला प्रश्न विचारला आहे. राज्यात शासकीय सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढल्या आहेत. कोकाटे याचीं विकेट पडली आहे ,तर त्यांनी स्वतः खड्डयात उडी मारली, योग्य वेळी केस बाहेर आली आहे, संजय राऊतांनी माणिकराव कोकाटेंना टोमणा मारला आहे.

शासकीय सदनिका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही दोन्ही मंत्रीपदे काढून घेण्यात आली आहेत. यासंदर्भातील आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी बुधवारी रात्री उशिरा जारी केला आहे, मात्र, कोकाटे यांचे मंत्रिपद पूर्णपणे रद्द करण्यात आलेले नाही. त्यांच्या कडील खात्यांचा कार्यभार काढून घेण्यात आला असून सध्या ते बिनखात्याचे मंत्री आहेत. आता या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, कोणाला वाचवायचा प्रयत्न होतो आहे, ज्या अध्यक्षांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला आहे. सुनील केदार यांच्या बाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला, कोकाटे यांचे काय? नार्वेकर असे म्हणतात की, मूळ प्रत येऊ द्या. राज्यातील ड्रग्सचे रॅकेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाजपा सरकारच्या मंत्र्यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. तर महाराष्ट्रात उद्योगमध्ये मोठी गुंतवणूक येणार आहे, असे फडणवीस म्हणतात, ते हेच उद्योग राज्यात येणार आहे का? असा प्रश्न शिवसेना नेते यांनी राज्यातील भाजपा सरकारला विचारला आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, देशातील भाजपा सरकारचे नेते अमित शाह हे देशातील व राज्यातील माणसे , प्रादेशिक वा राजकीय पक्ष तोडण्यात पटाईत आहेत. धनंजय मुंडे हे मंत्री होतील का नाही याविषयी मी सांगू शकत नाही. परंतु, त्यांना परत मंत्रीपदी पुन्हा घेणे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा सरकार यांना सोपे नाही. ज्या पद्धतीने बीडमध्ये संतोष देशमुख यांचा खून झाला, त्या प्रकरणात मुंडे यांचे समर्थन असलेल्या राज्यातील काही राजकीय गुंडांच्या टोळया सहभागी होत्या. याच कारणासाठी त्यांना मंत्रीपदावरून जावे लागले. मग ते कारण अजून संपले का? अजूनही वाल्मीक कराड जेलमध्ये आहे. अजूनही खटला संपलेला नाही. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप होते, अशांना पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात घेण्याचे पाप देवेंद्र फडणवीस करतील, असे मला वाटत नाही. राज्यातील भाजपा सरकारचे दोन मंत्री फडणवीस मंत्रिमंडळातले भ्रष्टाचार आणि गुंडागर्दी या आरोपावरून घरी गेले आहेत. हा या राज्यातील भाजपा सरकारला लागलेला काळीमा आहे. खरे म्हणजे शिंदे गटाचे असे असंख्य मंत्री आहेत, त्यांना तात्काळ बरखास्त केले पाहिजे. राज्यातील निवडणूकांत मतदानासाठी मतदारांना पैशाच्या बॅगा दाखवत आहेत, पैसे मोजताना दिसत आहेत, असे असंख्य विषय आहेत.

पण, राज्याचे भाजपा सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टप्प्याटप्प्याने राज्यातील छोटया राजकीय पक्षांचा गेम करतील आणि शेवटचा घाव ते राज्यातील राजकीय मित्र पक्षांतील मिंध्यांवरच घालतील, असेच चित्र सध्या राज्यात दिसत आहे. कोकाटे ही हिट विकेट आहे. त्यांनी स्वतः खड्डयात उडी मारली आहे. ती केस आत्ताची नाही. मात्र, ती योग्य वेळी बाहेर आली, या राज्यात भाजपा सरकारमधील मंत्री व नेते यांच्यावर असंख्य भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, राज्यातील काही राजकीय नेते अनेक घोटाळे करूनही मंत्रीपदावर अजुनही आहेत, आणि राज्यातील काही राजकीय नेत्यांचे घोटाळे येत्या काळात बाहेर निघणार आहेत, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत. राज्यात सगळीकडे भाजपा सरकारच्या मंत्रीमंडळातील, सामील नेत्यांचा गोलमाल कारभार, भ्रष्टाचार हे राज्यातील जनता पाहत आहे. राज्यात सगळीकडे घोटाळेच चालले आहेत, आणि रोज नवीन घोटाळे बाहेर निघत आहेत, तरीही राज्यातील भाजपा सरकार कोणावरही कडक कारवाई करताना दिसत नाही ,अशी स्थिती राज्यात सध्या दिसत आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा