‘कुणाला सांगितलं तर तुला…’; अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, भीतीपोटी पीडिता गप्प, अखेर…

SHARE:

जळगाव : जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १५  वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बळजबरीने शारीरिक संबंध
जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह राहते. साधारण सहा महिन्यांपासून ते २०  सप्टेंबर २०२५  या कालावधीत, संशयित आरोपी मुकेश साकेत (रा. उमरिया, मध्य प्रदेश) याने पीडितेच्या घरात घुसून तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुकेश केवळ अत्याचार करूनच थांबला नाही, तर ही बाब कोणाला सांगितल्यास त्याने पीडितेला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या भीतीपोटी पीडिता काही दिवस गप्प होती. मात्र, अखेर हा प्रकार समोर आल्यानंतर १९  डिसेंबर २०२५  रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयिताविरोधात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम-२०२१२ (पोक्सो) यासह इतर कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

Leave a Comment

अधिक वाचा