
अमरावती – बाबू हरदास आवळे यांनी बाबासाहेबांच्या धर्मांतराला न्याय मिळवून देण्याचे काम केले, असा गौप्यस्फोट बुद्धिष्ठ इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय प्रभारी संदिप मानकर यांनी सोमवारी केला. ते अमरावती जिल्हयातील परतवाडा येते भदंत आनंद कौसल्यायन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एक दिवसिय धम्म परिषदेत बोलत होते.
संदिप मानकर पुढे म्हणाले कि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सार्वजनिक जिवनात प्रवेश करण्यापूर्वी भारतावर इंग्रजांचं नियंत्रण होतं, त्यावेळीही ब्राह्मणांनी भारतात मनुसमृती लागू केली होती. त्या मनुस्मृतीच्या अनुसार, एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक लोकांना अधिकार वंचित करण्यात आले होते. म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिकार वंचित लोकांना अधिकार मिळाले पाहिजे, यासाठी १९१६ मध्ये साउथ बेरो कमिशनसमोर लिखीतमध्ये प्रतिनिधित्वाची मागणी केली. त्यात एससी, एसटी आणि ओबीसींना इंग्रजांच्या कायदा बनवणार्या संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे.
ज्या मनुस्मृतीने एससी, एसटी, ओबीसी लोकांना अधिकार वंचित केले होते, ती मनुस्मृती बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी जाळली. १९३० मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला. ज्यात जवळपास ३० हजार लोकांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनावेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी एससी, एसटी आणि ओबीसी लोकांना समजवण्यासाठी कि आम्ही हिंदू नाही आहोत. त्यांनी मंदिर प्रवेशाचे आंदोलन सुरू केले. जेव्हा हे आंदोलन सुरू झाले तेव्हा ब्राह्मणांनी आंदोलनकर्त्यांवर दगडफेक केली. बाबासाहेब आंबेडकरांवर देखील दगडफेक केली. यात शेकडोंच्या संख्येने लोक जखमी झालेत. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आपल्या लोकांना समजवतांना म्हणाले कि जर तुम्ही हिंदू आहात आणि ब्राह्मण देखील हिंदू असते तर दोघेही बंधू असते. जर दोघेही भाऊ असते तर त्यांनी मंदिर प्रवेशावरून आक्षेप घ्यायला नको होता. त्यांनी आमच्यावर दगडफेक केली, याचा अर्थ आम्ही हिंदू नाही आहोत, असही ते म्हणाले.
१९३० मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना समजवण्यासाठी हे आंदोलन सुरू केले. यानंतर त्यांनी १९३५ मध्ये धर्मांतर करण्याची घोषणा केली. ते म्हणाले होते कि जो धर्म आम्हाला शिक्षण, संपत्ती आणि शस्त्र धारण करण्यापासून वंचित ठेवतो, तो धर्म नसून एक षड्यंत्र आहे. अशा धर्माचा आम्ही त्याग करतो. यानंतर १९५६ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरण केले. परंतू याच्या एक दिवसापूर्वी बाबासाहेबांच्या काही सहयोगी लोकांनी धर्मांतराचा विरोध केला. यात दादासाहेब गायकवाड यांचा समावेश होता, असा खुलासा त्यांनी केला.
बुद्धिष्ठ इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय प्रभारी म्हणाले कि बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी धर्मांतराचा विरोध करणार्यांना दम दिला होता. ते म्हणाले होते कि जे काम मी करत आहे, त्यात कोणी आडवे येण्याचा प्रयत्न केला तर हे तुमच्यासाठी योग्य होणार नाही. बाबासाहेब यांच्या घोषणेनंतर आक्षेप घेणार्यांचे बंड थंड झाले. यानंतर संध्याकाळी पत्रकारांनी बाबासाहेब आंबेडकर यांना प्रश्न केला. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना बाबासाहेब म्हणाले कि माझ्या समाजातील लोक अशिक्षित आणि अज्ञानी आहेत. मी आपल्या उपदेशातून माझ्या समाजाच्या लोकांवर बौद्ध धम्माचा प्रभाव निर्माण करील आणि लवकरच मी भारताला बौद्धमय करीन.
१९५६ ला बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतरण केले. धर्मातरणाच्या या मोहिमेत जवळपास १० लाख लोक धर्मांतरण करण्यासाठी आहे. यामुळे भारतातचं नाही तर जगभरात यावर चर्चा होऊ लागली. ही इतिहासातील युगप्रवर्तक घटना आहे. बाबासाहेब धर्मांतरण करत असताना त्यांची हत्या करण्याच्या उद्देशाने भवानी शंकर नियोगी नावाचा ब्राह्मण मंचकावर गेला होता. परंतू मोठ्या संख्येने असलेल्या जमावाला पाहून त्याला वाटले कि लोक मलाचं मारतील, म्हणून तो काहीच करू शकला नाही, असाही खुलासा मानकर यांनी केला.
बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर या ऐतिहासीक जागेवर त्यांच्या सहयोगी लोकांनी बाबासाहेब आणि भगवान बुद्ध यांचा पुतळा बसवला. बाबू हरदास आवळे यांनी हा पुतळा बसवला. यामुळे प्रशासनात खळबळ माजली. यानंतर चौकशी सुरू झाली कि हा पुतळा कोणी बसवला. तेव्हा सर्व नेत्यांनी हात वर केले कि हा पुतळा आम्ही नाही बसवला. मुंबईत असताना बाबू हरदास आवळेंना माहित झाले कि प्रशासनाने घोषित केले आहे कि ज्यांनी बसवला त्यांनी हा पुतळा काढावा अन्यथा आम्ही काढून टाकू. बाबू हरदास आवळे समोर आले आणि धमकी दिली कि हा पुतळा मी बसवला आहे. जर हा पुतळा काढला आमचे लोक रक्ताच्या नद्या वाहण्यासाठी तयार आहेत. यानंतर प्रशासनाने पुतळा काढला नाही आणि तो दीक्षाभूमीच्या नावाने आवंटीत करण्यात आला, असं ते म्हणाले.
मानकर यांनी सांगितले कि बाबासाहेब आंबेडकर धर्मांतरादरम्यान एका पत्रकाराला म्हणतात कि समाज जीवनाचे मूळ हे समता, स्वंतत्रता, बंधूता आणि न्याय यावर आधारित आहे. हे प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण जीवनभर काम केले.बाबासाहेबांच्या धर्मांतराला चुकीचे सिद्ध करण्याचे काम ब्राह्मणाकडून झाले. १९६२ मध्ये निवडणूक झाली. या निवडणूकीत धरमदास मेश्राम आणि शंभरकर दोघेही आरक्षित जागेवर एकमेकांविरोधात उभे ठाकले. यात धरमदास मेश्राम निवडणूक जिंकले आणि शंभरकर यांचा पराभव झाला. यानंतर शंभरकर यांच्या वकीलाने असा युक्तीवाद केला कि धरमदास मेश्राम एससी नाही. ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरात सहभागी होते. यामुळे ते आता अल्पसंख्याक झाले आहेत. धर्मपरिवर्तन केल्यानंतर ते बुद्धिष्ठ झाले. बुद्धिष्ठ झाल्यानंतर ते आता अल्पसंख्याक झाले. अल्पसंख्याक लोकांसाठी ही रिर्जव जागा नाही.
यानंतर धरमदास मेश्राम यांनी वकील केला. त्यांच्या वकिलाचे नाव भवानी शंकर नियोगी असे होते. कोर्टात भवानी शंकर नियोगी जे पूर्वी न्यायाधीश होते आणि निवृत झाल्यांनतर त्यांना पुन्हा हायकोर्टात वकीली सुरू केली. ते या खटल्याप्रकरणी कोर्टात म्हणाले कि बाबासाहेब जे धर्मांतरण करत होते, तो धर्मांतरणाचा कार्यक्रम नव्हता. ती एक मोठी सभा होती. हे त्यांनी कोर्टात सिद्ध केले. त्या आधारे कोर्टाने निर्णय दिला कि बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धर्मांतरण केलेले नाही, असा दावा त्यांनी केला.
यानंतर बाबू हरदास आवळे यांनी कोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची घोषणा केली. यानंतर दादासाहेब गायकवाड यांनी आवळे यांना पत्र लिहिले कि आरपीआयचा एक आमदार निवडूण आला आहे, जर तुम्ही सुप्रीम कोर्टात गेले तर आरपीआयचा जिंकलेल्या एका उमेदवाराची आमदारकी धोक्यात येईल. मात्र बाबू हरदास आवळे म्हणाले कि बाबासाहेबांची जीवनभराची कमाई मातीत मिसळू देणार नाही. त्यांनी ही केस लढली आणि बाबासाहेबांच्या धर्मांतराला न्याय मिळवून देण्याचे काम केले, असा गौप्यस्फोट संदिप मानकर यांनी केला.





