बिग बॉस मराठी-६’ च्या पहिल्यावहिल्या स्पर्धकासाठी चॅनेलनेच केली पोस्ट; कोण आहे ही सुपरमॉडेल जाणून घ्या…

SHARE:

मनोरंजन विश्व् – ‘बिग बॉस मराठी’ या कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या शोमध्ये प्रत्येक पर्वात वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धक सहभागी होतात. अभिनेते, अभिनेत्री, राजकारणी मंडळी, नृत्यांगना, शेफ अन् अगदी सामान्य व्यक्तींनीही या खेळात एन्ट्री करुन प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता आगामी ‘बिग बॉस मराठी-६’ विषयी चर्चा रंगली असून काही स्पर्धकांची नावे विविध मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहेत. ११ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या शोमध्ये सहभागी होण्यासाठी सागर कारंडे, दीपाली सय्यद, राकेश बापट, करण सोनवणे, राधा मुंबईकर, संकेत पाठक, रसिका जामसूतकर या नावांवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. आता एका सुपरमॉडेलच्या सहभागाविषयीची पोस्ट कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे.

कलर्स मराठीने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये मागे प्रकाश असणारी केवळ एका स्त्रीची आकृती दिसते आहे. वाहिनीच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ एआय तंत्रज्ञानाने तयार केला असावा, असाही अंदाज आहे. हा व्हिडिओ शेअर करताना असे कॅप्शन दिले आहे की, ‘बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करणारी कोण असेल बरं ही सुपर मॉडेल? ‘बिग बॉस मराठी’ ११  जानेवारीपासून दररोज रात्री ८  वाजता फक्त कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर.’

दरम्यान ही सुपरमॉडेल कोण असेल, याविषयी अनेक कमेंट आल्या आहेत आणि प्रेक्षक अंदाज बांधत आहेत. काही प्रेक्षकांनी अशी कमेंट केली की, ही सोनाली राऊत असावी. अभिनेत्री-मॉडेल असणारी सोनाली या मराठी शोमध्ये सहभागी होणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सोनालीने याआधी ‘बिग बॉस ८’ हा सलमान खानचा शो गाजवाल होता. शिवाय ती ‘द एक्सपोज’ आणि ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या चित्रपटामध्येही झळकली आहे. सोनाली अभिनय क्षेत्रासह मॉडेलिंगमध्येही सक्रिय आहे, त्यामुळे चाहत्यांचा हा अंदाज योग्य ठरेल का, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

याशिवाय काहींनी उर्मिला निंबाळकर, लोपामुद्रा राऊत, ईशा केसकर ही नावेदेखील कमेंट केली आहेत. ११  जानेवारी रोजीच ही सुपरमॉडेल कोण असेल, यावरुन पडदा हटेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

Leave a Comment

अधिक वाचा