सांगली महापालिका क्षेत्रात भाजपाच्या काळात, गुन्हेगारी, नशा, ड्रग्सचे प्रमाण वाढले, जयंत पाटलांचा भाजपावर आरोप…

SHARE:

सांगली – सांगली महापालिका क्षेत्रात भाजपाच्या काळात, गुन्हेगारी, नशा, ड्रग्सचे प्रमाण वाढले आहे, असा जयंत पाटलांनी सांगली भाजपावर आरोप केला आहे राज्यात निवडणूका आल्या भाजप नेते आणि अजित पवारांची एकमेकांवर टीका सुरू झाली आहे, असे जयंत पाटलांनी म्हटले आहे. सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी बोलताना राज्यातील सध्याचे राजकारण, पवार कुटुंब आणि महापालिका निवडणुकांतील टीका यावरुन भाष्य केले आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. सत्ताधारी महायुतीमधील भाजप नेते आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हेही एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसून येतात. त्यामुळे, महापालिका निवडणुका ह्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्येच वाद सुरू आहेत, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

विरोधक महाविकास आघाडीतील नेते किंवा पक्ष निवडणुकांतच नाही, असे चित्र पाहायला मिळत आहेत. आता, अजित पवार आणि भाजप नेत्यांमधील टीके राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पडद्यामागचे राजकारण सांगितले आहे.तसेच, अजित पवारांकडून पवार कुटुंब एकत्र येत असल्याबाबतचे वक्तव्य केले जाते, त्यावरूनही पाटील यांनी ठोस भूमिका मांडली आहे.

सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. त्यावेळी, बोलताना त्यांनी सध्याचे राज्याचे राजकारण चुकीच्या दिशेने सुरू आहे, असे म्हटले आहे. पवार कुटुंब आणि महापालिका निवडणुकांतील टीकेवरुन बोलले आहे. सत्तेत असूनदेखील दोन पक्षातील नेते एकमेकांविरोधात टीका करतात, अगदी जोरात बोलत आहेत. भाजप नेते आणि अजित पवार यांच्यामध्ये होत असलेली वक्तव्य पाहता विरोधकांना जागा मिळू नये,यासाठी हा प्रयत्न असावा, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. म्हणजेच, भाजप नेते आणि अजित पवारांची एकमेकांवर होणारी टीका ही सत्ताधाऱी पक्षांकडून जनतेची दिशा भूल करण्ययासाठी जाणीवपूर्वक करण्यात येत आहे., तर ते अंतर्गत सत्ताधारी सरकारचे राजकारण असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहेत. या षड्यंत्रात राज्यातील सत्ताधारी पक्ष सहभागी आहेत असे मला वाटते, असेही पाटील म्हणाले.

राज्यात सध्या दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार स्वतः भाषणातून याबाबत बोलत आहेत. मात्र, यासंदर्भात सध्यातरी राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते माहित नाही असे बोलल्याचे पाहायला मिळाले आहे. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत राज्यस्तरीय स्तरावर काय चर्चा सुरू आहे, याची मला कल्पना नाही. त्यामुळे, मी या विषयावर काहीही बोलु शकत नाही , असे जयंत पाटील म्हणाले आहेत.

सांगलीत यावर्षी मतदारांना नवा पर्याय दिला आहे. या निवडणुकीत नवा पर्याय म्हणून सांगलीकर या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला स्वीकारतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये भाजपाच्या काळात महापालिका क्षेत्रात गुन्हेगारी वाढली आहे, तर सांगलीत शहर व उपनगरात नशा, ड्रग्सचे प्रमाण वाढले आहे, याचा सर्वसामान्य सांगलीकर लोकांच्या मनात राग आहे. त्यामुळे, भाजपला शहर महापालिकेत जास्त जागा मिळणार नाहीत, असेही जयंत पाटील म्हणाले आहेत.

राज्यातील लातुरमध्ये विलासराव देशमुख यांचं नाव विसरायला लावू असे ,भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणायचे धाडस करत असतील तर, या लोकांमध्ये खासगीत काय चर्चा होत असतील याचा अंदाज या वक्तव्यावरून येतो आहे, विलासराव देशमुख ,यांच्यावर केलेले वक्तव्य लातूरकर जनता मान्य करणार नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Comment

अधिक वाचा