राज्यात महानगरापालिका निवडणुकांत गुन्हेगारी घटनांत वाढ, पुण्यात वडगाव शेरीत, दगडफेक झाल्याची घटना…

SHARE:

पुणे – राज्यात महानगरापालिका निवडणुकांत गुन्हेगारी घटनांत वाढ झाली आहे, पुण्यात वडगाव शेरीत, दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. पुण्यात निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये दगडफेकीची घटना घडली आहे. सोपाननगरमध्ये दगडफेक झाली आहे, या प्रकरणात दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. राज्यात महानगरापालिका निवडणुकांचे वातावरण असताना, राज्यातील गुन्हेगारी घटना वाढत आहेत. वडगाव शेरीतील सोपाननगरमध्ये, दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.

राज्यात महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरु आहे. सोलापूर, अकोल्यातील अकोट, खोपोलीतील इथे झालेल्या हत्यांमुळे निवडणुकीच्या काळातील गुन्हेगारी घटनांबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात काल रात्री दगडफेक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या व्हिडिओत वडगाव शेरीतील सोपाननगरमध्ये दोन गटात वाद झाला आहे. सोपाननगरमध्ये रस्त्यावर दुचाकी पडलेली दिसून येते. याशिवाय काही तरुण हातात मोठे दगड घेऊन फेकताना दिसत आहेत. आता या युवकांवर पोलीस काय कारवाई करणार आहेत.

पुणे शहरात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील सोपाननगर परिसरात, काल रात्री उशिरा तरुणांच्या दोन गटांमध्ये दगडफेक व मारामारीची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.व्हायरल व्हिडिओमध्ये काही तरुण एकमेकांवर दगडफेक करताना दिसत आहे. त्या व्हिडिओत रस्त्यावर प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पसरले असून भयमुक्त व दहशतमुक्त वडगाव शेरीची मागणी जोर धरू लागली आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारामुळे पुण्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असल्याने पुण्यातील पोलीस प्रशासनावर ताण असल्याचे पाहायला मिळत आहे. याचवेळी कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लावणार्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा