राशींभविष्य – आज ९ जानेवारी २०२६ , आजचा वार शुक्रवार आहे. नुकतंच २०२६ वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? १२ राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये ज्या व्यक्तीवर काम सोपवले जाईल, ती व्यक्ती विश्वासार्ह आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागेल.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांनो आज महिलांनी तब्येतीला जपावे आज थोडा संघर्ष काळ आहे, यामध्ये थोडी धडाडी ठेवलीत तर तुमची कामे होऊन जातील.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यावर कुरबोळी करण्याचा स्वभाव नसला तरी, थोडा अहंकाराचा भाग राहीलच.
कर्क रास (Cancer)
कर्क राशीच्या लोकांनो आज दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही, जोडीदाराकडून बऱ्याचशा अपेक्षा पूर्ण होतील.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज व्यवसायात बरीच उलाढाल कराल, तुम्ही मांडलेली मते दुसऱ्याच्या गळी उतरवाल.
कन्या रास (Virgo )
कन्या राशीच्या लोकांनो आज मनात नसताना प्रवासाला जावे लागेल किंवा नोकरीमध्ये जेथे पाहिजे तिथे प्रवासाला पाठवणार नाहीत.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांनो आज महिला सर्वांना समजावून घेतील, अत्यंत आशावादी आणि कोमल मनाचा दिवस.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज तब्येत चांगली तर इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला जमेल, त्यामुळे आरोग्य पहिले सांभाळा.
धनु रास (Sagittarius)
धनु राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना बौद्धिक बाजू शैक्षणिक क्षेत्रात चांगली सांभाळता येईल, एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते.
मकर रास (Capricorn)
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या हजरजबाबीपणामुळे लोकांवर प्रभाव पाडाल, परंतु उठ सूट दुसऱ्यावर टीका करण्याचे टाळा.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या मताशी ठाम राहाल, त्यामुळे कोणत्याही कामासाठी इतरांचा होणारा विरोध आणून पाडाल.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांनो आज राजकारणी लोक आपल्या मुत्सद्दीपणा दाखवतील, महिला थोड्या अशांत राहतील.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





