मुंबई – मुंबई महानगरपालिका निवडणूकांसाठी, शिंदेंगटाच्या शिवसेना उमेदवाराचा मातोश्रीबाहेरच प्रचार करताना पाहायला मिळाले आहे. महापालिका निवडणूकांसाठी शिंदेंच्या उमेदवाराचा मातोश्रीबाहेर प्रचार चालला होता. राज्यात निवडणूक प्रचारासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुमित वांजळे यांनी, थेट शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात प्रचार केला आहे.
राज्यभरात २९ महानगरपालिकांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. यातील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक असल्याने, यावेळी महापालिका निवडणुकीनंतर कोणाचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी यासाठी मतदान पार पडणार असून १६ तारखेला निकाल जाहीर केले जातील. निवडणूक प्रचारासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुमित वांजळे यांनी थेट शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री परिसरात प्रचार केला आहे.
मुंबईतील महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी शिवसेना आणि मनसे पक्ष युतीमध्ये लढतो आहे. त्यापैकी एक महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अधिक संघर्षमय झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधू निवडणूक प्रचारासाठी मुंबईचा गल्लीबोळा पिंजून काढताना दिसत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक ९३ साठीचे अधिकृत उमेदवार सुमित वांजळे यांनी उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर प्रचार केला आहे. गुरुवारी सकाळपासून त्याची प्रचार रॅली ही मातोश्री परिसरात सुरु होती. शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि रिपब्लिकन सेना यांची मुंबईत महायुती असून, त्यांनी प्रभाग क्रमांक ९३ साठी अधिकृत उमेदवार सुमित वांजळे यांना उमेदवारी दिली आहे. सुमित वांजळे हे शिवसेना झोपडपट्टी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रमुख आहेत.
शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि त्याच्या धनुष्यबाण या निशाणीवर दावा केला. शिवसेना खरी कोणाची याबाबत सुप्रित कोर्टात केस सुरु आहे. मात्र अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला या प्रकरणावर निकाल लागेपर्यंत, मशाल या चिन्हावर निवडणुका लढवाव्या लागत आहेत. अशातच शिवसेनेचे मूळ चिन्ह असलेल्या धनुष्यबाण या चिन्हावर, उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या प्रभागातून सुमित वांजळे हे निवडणूक लढवत आहेत. तर शिवसेना आणि मनसे युतीकडून वॉर्ड ९३ साठी रोहिनी कांबळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तेव्हा शिवसेनेचे होम ग्राउंड असलेल्या वॉर्ड ९३ मधील मतदार संघात सुमित वांजळे की रोहिनी कांबळे निवडून येतात हे पाहणे महत्वाचं असणार आहे. राज्यात महापालिका निवडणुका असल्यामूळे विविध राजकीय घडामोडी घडत आहेत.





