नवी दिल्ली – एखादा उमेदवाराने एससी, एसटी आणि ओबीसी या आरक्षीत प्रवर्गातून आरक्षाणचा फायदा घेतला असेल तर तो भविष्यात खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा करू शकत नाही. अंतिम गुणवत्ता यादीत सामान्य प्रवर्गातील उमेदवारापेक्षा जास्त गुण असले तरी त्या उमेदवाराचा विचार केवळ आरक्षित जागेसाठीच केला जाईल, असे न्यायाधीश जे. के. माहेश्वरी आणि विजय बिश्नोई यांच्या खंडपीठाने नमूद केले.
हे प्रकरण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस २०१३ च्या भरती प्रक्रियेशी संबंधित होते. यामध्ये जी. किरण नावाच्या उमेदवाराने पूर्व परीक्षेत आरक्षित प्रवर्गाच्या कमी कट-ऑफचा फायदा घेऊन पात्रता मिळवली होती. मात्र, मुख्य परीक्षेत आणि मुलाखतीत त्यांनी चमकदार कामगिरी करत सामान्य प्रवर्गातील उमेदवारापेक्षाही सरस रँक मिळवला. या आधारावर त्यांनी जनरल जागेवर दावा केला होता. कर्नाटक उच्च न्यायालयाने हा दावा मान्य केला होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय आता रद्द केला आहे.
देशात मागास आणि अनुसुतिच जातींसाठी तयार करण्यात आलेल्या आरक्षण धोरण आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी मिळणाऱ्या सवलतींबाबत न्यायालयानं महत्वाचा निर्णय दिला. जो विद्यार्थी आरक्षित श्रेणीमधून सुरूवातीच्या परीक्षा, प्रिलिम्समध्ये आरक्षण नियमानुसार मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेतो त्याला याच आरक्षित श्रेणीअंतर्गत पुढे देखील रहावं लागणार आहे. जर या उमेदवारानं अंतिम परीक्षेत चांगलं मेरीट किंवा चांगले मार्क मिळवले. त्या आधारे तो ओपन सीटवर दावा करू शकत नाही. त्याला सुरूवातीच्या परीक्षा ज्या आरक्षित श्रेणीतून दिल्या होत्या त्याच श्रेणीत रहावं लागणार आहे.
जस्टिस जेके माहेश्वरी आणि जस्टिस विजय बिश्नोई यांच्या खंडपीठानं केंद्र सरकारची याचिका स्विकारत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. कर्नाटक उच्च न्यायालयानं अनुसूचित जातीच्या एका उमेदवाराला ओपन श्रेणीमधून नियुक्ती देण्यास परवानगी दिली होती. त्या उमेदवाराला अंतिम परीक्षेत मेरीटमध्ये लिस्टमध्ये ओपन उमेदवारापेक्षा चांगले गुण मिळाले होते.
सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात चांगल्या रँकचा युक्तीवाद बाजूला ठेवत जर एखाद्या उमेदवारानं निवड प्रक्रियेच्या कोणत्याही स्तरावर आरक्षणाच्या सवलतीचा लाभ घेतला असेल तर तो ओपन श्रेणीतील सीट आरक्षित नसलेल्या श्रेणीसाठी पात्र होऊ शकत नाही. खंडपीठाने निर्णय देताना सांगितलं की ज्यावेळी एखादा उमेदवार आरक्षित श्रेणीचा लाभ घेतो त्यानंतर तो ओपन जागेवर नियुक्तीसाठी दावा करून शकत नाही.





