लातूर महानगरपालिकेत ३८ अपक्ष उमेदवार, शिंदेंगट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार…

SHARE:

लातुर – लातूर महानगरपालिकेत ३८  अपक्ष उमेदवार, शिंदेंगट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदेंची लातूरमध्ये मोठे राजकारण खेळले आहे. राज्यातील भाजप-काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत आहेत. राज्यात २९  महापालिकांसाठी १५  जानेवारी २०२६  ला मतदान होणार आहे. मात्र त्याआधी राज्यात अनेक ठिकाणी महत्वाच्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

राज्यात लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील 38 अपक्ष उमेदवार शिवसेना शिंदे गटात एकाचवेळी भाजप आणि काँग्रेसला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिंदे यांनी लातूरमध्ये मोठा राजकीय डाव खेळल्याचे केल्याचे दिसून येत आहे. ३८  अपक्ष उमेदवारांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे.

लातूर महानगर पालिका निवडणूकीत एकूण प्रभाग १८ व जागा ७०  आहेत. राज्यातील भाजप हा पक्ष ७०  सर्व जागा स्वतंत्र लढत आहे. तर काँग्रेस ६५  जागा वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी करून ७०  पैकी ६५  जागेवर काँग्रेस ५  जागेवर वंचित बहुजन आघाडी निवडणुक लढवित आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट ६०  जागा पैकी १०  जागेवर पुरस्कृत उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट १७  जागेवर अधिकृत उमेदवार आहेत, शिवसेना शिंदे गट ११  जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत, शिवसेना ठाकरे गट ०९  जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत.

लातूर महापालिकेच्या निवडणुकीत देशात भाजपाची सत्ता आल्यानंतर राजकीय वातावरण बदलले होते. त्याचा फायदा लातूर भाजपाला झाला. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमध्ये सत्तांतर झाले. भाजपाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने ३६  जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसला ३१  जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. आता लातूर महानगरपालिकेत १८ प्रभागांतील ७०  जागांसाठी निवडणुका होत आहेत.

Leave a Comment