सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे, गर्भलिंग निदान व तपासणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोलापूरात पडीक शेतातल्या आलिशान कारमधील गर्भलिंग निदान व तपासणी केल्याचा ’तो’ प्रकार पाहून पोलिसांनाच धक्का बसला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून टाकणारा प्रकार सोलापुरमधील बार्शी तालुक्यातून समोर आला आहे. पोलिसांनी हे सारे प्रकरण उजेडात आणले आहे, तर छापेमारीत कारमध्ये सापडलेल्या वस्तू पाहून पोलिसही चक्रावले आहेत. सोलापुरमधील बार्शीमध्ये भल्या पहाटे सोलापुर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. एका शेतात कार पार्क करुन ,पहाटे पावणे पाचच्या सुमारास गर्भलिंग निदान व तपासणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. कारमधील साहित्य पाहुन सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेकांना विश्वास बसणार नाही असा गंभीर प्रकार, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी उघड केला आहे. सोलापूर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणे किंवा तपासणी करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. मात्र सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या वेळेस अतिशय धक्कादायक पद्धतीने, गर्भलिंग निदान होत असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे.
बार्शी तालुक्यातील जामगाव शिवारामध्ये, एका आलिशान कारमध्ये सुरू असलेल्या, लिंगनिदान केंद्रावर पोलिसांनी धाड टाकली आहे. अत्यंत शिस्तीत आणि शांततेत चाललेल्या गर्भलिंग निदान केंद्रावर, धाड टाकत पोलिसांनी एका बोगस डॉक्टराला अटक केली आहे. बार्शी तालुक्यामध्ये चालत्या फिरत्या आलिशान कारमधून, एखाद्या शेतात कार पार्किंग करत, गर्भलिंग निदान करण्यात येत होते. हे बेकायदा गर्भपात केंद्र बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी, उघडकीस आणला आहे. १८ लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी पहाटे पावणे पाचच्या सुमारास जामगाव शिवारातील, वानेवाडीकडे जात असलेल्या, रस्त्यावरील पडीक शेतात ही आलिशान कार पकडली आहे. सदरच्या कारमधून दोन पिशव्यांची झडती घेतली असता, हा प्रकार उघडकीस आला आहे. बार्शी ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यामध्ये, ३ लाख रुपयांची झोन केअर चालू स्थितीतील, पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि प्रोब आढळले आहेत. त्यासोबतच गर्भपातासाठी वापरल्या जात असलेल्या, मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टोल या प्रतिबंधित १४४ सीलबंद औषधी सापडल्या आहेत. यासोबतच गर्भपातासाठी वापरलेल्या औषधांची ,51 रिकामी पाकिटे आणि रक्त लागलेले गर्भपाताचे, साहित्य तेथे सापडले आहे.
सोलापुरात हादरवून टाकणारी घटना घडली आहे, तर रक्तस्त्राव थांबवण्याचे इंजेक्शन, सलाईनच्या बाटल्या, ग्लोव्हज असे वैद्यकीय साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी, अत्यंत कौशल्याने आणि खबरी लोकांच्या माहितीनुसार, ही मोठी कारवाई केली आहे. तर चालतं फिरते गर्भलिंग निदान प्रकरण सोलापुर पोलिसांनी उघड केले आहे. आलिशान कार, लिंगनिदान केंद्र, लिंग निदानाचे साहित्य आणि एक बोगस डॉक्टर सध्या पोलिसांच्या ताब्यात घेतला आहे.
तर सोलापुर जिल्ह्यात किंवा जिल्ह्याच्या बाहेर आणखी कोणकोणते कारनामे केलेले आहेत, याचा सोलापुर अधिक तपास करत आहेत. यासोबतच याचे आंतरराज्य टोळीशी काही संबंध आहे का? याचा कसून तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र बोगस डॉक्टराच्या या चलाखी धंद्यामुळे आत्तापर्यंत किती निष्पापांचे बळी गेले आहेत? या बोगस डॉक्टरला माहिती आहे. डॉक्टरांचा हा गोरख धंदा उघड झाल्यानंतर, पोलीस चक्रावले आहेत. या बोगस डॉक्टर सोबतच या प्रकरणात आणखी कोणी आरोपी सापडतात का?याचा अधिक तपास सोलापुर पोलिस करत आहेत.




