राज्यातील समृद्धी महामार्गाच्या जमिनीबाबत आम्ही अडवले नसते, तर भाजपा सरकारने शेतकर्यांच्या जमिनी लुटून घेतल्या असत्या – अंबादास दानवेंचा भाजपावर आरोप

SHARE:

छ. संभाजीनगर – राज्यात समृद्धी महामार्गाच्या जमिनीबाबत आम्ही अडवले नसते, तर भाजपा सरकारने शेतकर्यांच्या जमिनी लुटून घेतल्या असत्या, असा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील भाजपा सरकारवर आरोप केला आहे. आमची लढत थेट भाजप आणि शिंदे गटाशी आहे. आमची कोणतीही राजकीय लढत नाही, असे देखील अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणानंतर इम्तियाज जलील यांनी पोलिसांसमोर हा हल्ला झाला असून पोलिस काय कारवाई करतात? ते आता पाहणार असल्याचे म्हटले आहे. हल्ला करत असलेल्या गुंडांना पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांचे संरक्षण असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला होता. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अंबादास दानवे म्हणाले की, इम्तियाज जलील हे भाजपचेच हस्तक असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहराला व्यसन लावले आहे. काळे धंदे करणारा हा व्यक्ती पैशाच्या बळावर आणि सत्ताधाऱी लोकांच्या जीवावर निवडून येतो, अशी टीका त्यांनी केली आहे. तर आमची लढत थेट भाजप आणि शिंदे गटाशी आहे. आमची कोणतीही राजकीय लढत नाही. उलट शिंदे गटातच एकमेकांविरोधात आव्हाने निर्माण झाली , त्यांच्यातच संघर्ष सुरू आहे, असे देखील अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

राज्यातील मुख्यमंत्री फडणवीसांचा टॉक शो नव्हे तर फेक शो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरूनही दानवे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टॉक शो नव्हता तर फेक शो होता. संभाजीनगर शहराबाबत ते बोललेच नाही. फडणवीसांनी सभा घ्यायला हवी होती. भाजपा या सभेपासून पळून गेली आणि टॉक शो केला. फडणवीसांनी उलट त्यांचीच स्क्रिप्ट बदलावी. भाषणात ते सर्व सारखेच बोलतात, फक्त शहराचे नावे बदलतात बाकी, सर्व सारखे असते. राज्यातील समृद्धी महामार्गाच्या शेतकर्यांच्या जमिनीबाबत आम्ही अडवले नसते, तरराज्यातील भाजपा सरकारने शेतकर्यांच्या जमिनी लुटून घेतल्या असत्या. शेतकर्यांना आम्ही पाचपट भाव मिळवून दिला. आमचा जमिनी देण्यासाठी विरोध नाही, तर दरासाठी विरोध होता. उद्धव ठाकरे शेतकर्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी आले होते, असे अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिले आहे.

संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेचेच वर्चस्व राहील. संभाजीनगर शहराला ३६५  दिवसांपैकी किंवा ४४ दिवस पाणी मिळाले. शहराला १४० एमएलडी पाणी येतं. मात्र आवश्यकता २४०  एमएलडीची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केवळ तारखा दिल्या, अजूनही पाणी संभाजीनगरला दिले नाही. लबाडांनो पाणी द्या. हे आंदोलन आम्ही केले आहे. भाजपा अजूनही संभाजीनगरच्या लोकांना खोटेच आश्वासन देते आहे. सध्या ठाकरे गटाकडून जोरदार प्रचार सुरू असून, १० तारखेला उद्धव ठाकरे यांची सभा संभाजीनगरमध्ये होईल. त्यानंतर शेवटचा एक टप्पा होईल. संभाजीनगर महापालिकेत शिवसेनेचेच वर्चस्व राहील, असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे. आणि राज्यातील भाजपा सरकार निवडणूका जवळ असताना संभाजीनगर वासियांना खोटे आश्वासन देऊन मते घ्यायच्या तयारीत आहे, भाजपा सरकारने संभाजीनगरला आधीच पाणी देण्याचे आश्वासन पुर्ण केले नाही, तर आता परत निवडणुकीत पुन्हा नवी खोटी आश्वासने देत आहेत, अशी ठाकरेगट शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी, राज्यातील भाजपा सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

Leave a Comment

अधिक वाचा