पिंपरी – राज्यांत महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला आहे. राज ठाकरे म्हणाले कि चार-पाच दिवसांपूर्वी ते आले होते. माध्यमांनी कुणी ते चालवले नाही. पण, अजित पवार स्वतः म्हणाले की आमच्या लोकांना भाजपाने सांगितले गेले की तुम्ही आमच्या पक्षामध्ये या. अडीच-अडीच हजार मते आम्ही आधीच मशीनमध्ये (ईव्हीएम) भरलेली आहेत, असा खळबळजनक दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा असंही राज ठाकरे म्हणालेत. तर सत्तेमधीलच एक भाग जो आता वेगळा होऊन महानगरपालिका निवडणूक लढवत आहे, इतका जबाबदार माणूस… महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अशा प्रकारचं स्टेटमेंट करतो की भाजपने मशीनमध्ये अडीच अडीच हजार मते भरलेली आहेत, म्हणजे आम्ही काय समजायचं. या सगळ्यांमध्ये जिंकण्या हरण्याचा विषय नाही. ही फेअर इलेक्शन नाहीयेत, असा मोठा आरोप राज ठाकरे यांनी केलाय.
राज ठाकरे म्हणाले कि ज्यांच्याकडे सत्ता नाही, त्यांना तुम्ही कायमचे बेसावध ठेवता. आता साधी गोष्ट की, चार प्रभाग करायची काय गरज आहे. मला कळत नाही की एखाद्या मतदारांने तिथे जाऊन चार बटणे का दाबायची? अशा प्रकारची व्यवस्था भारतात कुठेच नाहीये. प्रभागात चार वेगवेगळी माणसे निवडून येतात आणि मग कोणीच काम करू शकत नाही. कारण एखादा काम करायला गेला की दुसरा आडकाठी करतो. म्हणजे तो प्रभागाला काही अर्थच उरत नाही.
याबद्दल उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात गेलो. ते म्हणतात की हे निवडणूक आयोगाकडे येते. निवडणूक आयोग सांगतो की हा राज्य सरकारचा निर्णय आहे. मग आरक्षण पण सरकारचं पाडणार, प्रभागही सरकारच ठरवणार, सगळे सेट करायचे आणि मग विरोधकांना सांगायचं की आता लढा, अशी टीका राज ठाकरेंनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर केली.
ज्यावेळी एक किंवा दोन प्रभाग होते, ते बरे होते. आता चार प्रभागातील आरक्षण निघाल्यानंतर इतका गोंधळ आहे की त्याचे तुम्ही काहीच करू शकत नाही. आमचे अनेक नेते चर्चेला बसले होते. काही प्रभाग इतके विस्कळीत होते की आमचे काही महत्त्वाचे माणसे उभे राहू शकले नाहीत, असेही राज ठाकरे म्हणाले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भाजपचे निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांनी १२८ पैकी १२५ नगरसेवक भाजपचे निवडून येतील, असा दावा केला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी भाजपच्या 125 जागा आल्या, तर मी कायमचे राजकारण सोडेन. १०० जागा मिळवणं पण अवघड आहे. असं अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी म्हटलं होतं.




