आज रविवार, दि. ११ जानेवारी २०२५ कोणत्या राशींवर असणार सूर्यदेवाचा आशीर्वाद; वाचा आजचे राशीभविष्य…

SHARE:

राशींभविष्य – आज ११  जानेवारी २०२६  चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस आपण सूर्यदेवाला समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी भक्त सूर्यदेवाची पूजा करतात. आपल्या चुकीची माफी मागतात. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस १२  राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व १२  राशींचं आजचं राशीभविष्य.

मेष रास (Aries)
मेष राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. फक्त तुम्ही तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमाच्या बाबतीत अहंकार बाळगू नका. तसेच, आजच्या दिवसात कोणताही नवीन निर्णय घेताना सावधानता बाळगा. घराच्या आसपास गाय दिसली तर दान करायला विसरू नका. तुमच्यासाठी लवकर चांगली बातमी आहे.

वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना लवकरच नवीन प्रोजेक्ट हाती लागेल. तसेच, विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे.तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल.

मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमची एखाद्या जुन्या मित्राशी भेट होईल आणि जुन्या आठवणींना तुम्ही उजाळा द्याल. व्यवसायात एखादा करार होऊ शकतो. तसेच, संपत्तीचे अनेक मार्ग तुम्हाला सापडतील. मुलांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. काही महत्त्वाची कामे आज वेळेत पूर्ण होतील.

कर्क रास (Cancer)
कर्क राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुमच्यापाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा असताना तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. वैवाहिक जीवन सुखाचे जातील. आज संध्याकाळच्या वेळी पार्टनरला छान भेटवस्तू द्याल. तसेच, तुमचा आत्मविश्वासही वाढेल.

सिंह रास (Leo)
सिंह राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही दिग्गज लोकांची मदत मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला फार प्रवास करावा लागेल. या दरम्यान अनेक लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.

कन्या रास (Virgo)
कन्या राशीसाठी आजचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही इतके दिवस थांबून होता ते काम तुमचं वेळेत पूर्ण होईल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, सामाजत तुमच्या नावाचं कौतुक केलं जाईल. प्रगतीचे अनेक संकेत निर्माण होणार आहेत.

तूळ रास (Libra)
तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. पण, तुम्ही हाती घेतलेल्या कार्याने अनेकांना रोजगार मिळेल. त्यामुळे व्यवहारात फक्त स्वत:चाच विचार न करता इतरांचा देखील विचार करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.

वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होईल. मात्र, दिवसाच्या शेवटी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. भविष्यात तुम्ही प्लॅन केलेल्या योजनांवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच, तुमचा आत्मविश्वासही ढासळेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल.

धनु रास (Saggitarius)
धनु राशीसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. आज तुम्हाला तुमची अनेक रखडलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या हाती चांगली बातमी लागेल. लवकरच एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. प्रवासाचे योग आहे. फक्त आळस दूर ठेवा. यश तुमचंच आहे.

मकर रास (Capricorn)
मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल.

कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही.

मीन रास (Pisces)
मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Leave a Comment

अधिक वाचा