आईची हत्या करून बदमाशांनी मुलीला बळजबरीने पळवून नेले, योगी सरकारचा महिला सुरक्षेचा फुस्स

SHARE:

मेरठ – महिला सुरक्षेचा दावा करणार्या योगी सरकारच्या कार्यकाळात मेरठमध्ये बदमाशांनी अनु. जातीच्या एका मुलीला पळवून नेले. विरोध केला असता बदमाशांनी मुलीच्या आईची हत्या केली. सरधना पोलीस ठाण्याच्या परिसरात ही घटना घडली. या घटनेने योगी सरकारच्या कानून व्यवस्थेची पोल उघड झाली असून महिला सुरक्षेचा योगी सरकारचा दावा फुस्स झाल्याचे दिसून येत आहे.
मेरठमध्ये एका बदमाशाने दलित महिलेची हत्या करून तिच्या मुलीचे अपहरण केले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महिलेचा मृतदेह घेण्यासाठी रुग्णवाहिका आली तेव्हा संतप्त ग्रामस्थांनी त्याची तोडफोड केली. पोलिसांना मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवायचा होता, परंतु कुटुंब आणि गावकऱ्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. पोलिसांनी अपहरण आणि हत्येच्या आरोपाखाली आरोपीच्या आजी-आजोबांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे, तर आरोपीचे पालक आणि भाऊ घटनेपासून फरार आहेत.

सरधना पोलिस ठाणे परिसरातील रहिवासी सत्येंद्र कुमार मजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला पत्नी सुनीता, तीन मुले आणि एक मुलगी रूबी आहे. आर्थिक अडचणींमुळे सुमारे अडीच वर्षांपूर्वी रूबीला तिचे शिक्षण सोडावे लागले. तिच्या लग्नाबाबत कुटुंबात चर्चा सुरू होत्या.

आई आपल्या मुलीला शेतात घेवून जात असताना ही घटना घडली. रस्त्यात आधीच उपस्थित असलेल्या आरोपी पारस नावाच्या बदमाशाने त्यांना थांबवले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सुनीता यांनी प्रतिकार केला तेव्हा आरोपीने तिच्या डोक्यावर वार केले. त्यानंतर त्याने रूबीला जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवले आणि पळून गेला. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच, जवळचे लोक घटनास्थळी धावले आणि गंभीर जखमी सुनीता यांना मोदीपुरम येथील एसडीएस ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मृत्यूपूर्वी आईने यांनी सांगितले की हल्ला झाल्यानंतर ती घटनास्थळी पडली आणि आरोपी तिच्या मुलीला जबरदस्तीने घेऊन गेला. आरोपीचे नाव पारस असे आहे, जो गावात एका डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून काम करतो. पारस हा तीन भावांपैकी सर्वात लहान आहे. घटनेपासून त्याचे पालक आणि दोन भाऊ फरार आहेत. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेत आहेत.

मृतक महिलेचा मुलगा मनदीपने अधिकाऱ्यांसमोर हात जोडून आपली वेदना व्यक्त केली. तो म्हणाला माझी आई गेली आणि त्यांनी माझ्या बहिणीला जबरदस्तीने नेले आहे. आता आम्हाला आमच्या जीवाची भीती आहे. ते आम्हालाही मारतील. कृपया माझी बहीण परत द्या, साहेब. त्या क्रूरांची घरे बुलडोझरने पाडली पाहिजेत आणि त्यांना एन्काउंटरमध्ये शिक्षा झाली पाहिजे. हे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या कुटुंबातील इतर महिलांनाही अश्रू अनावर झाले.
या घटनेवरून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवपाल सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ते म्हणाले कि सरकार महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली फक्त खोटी आश्वासने देते. जसवंतनगरचे आमदार म्हणाले की उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे आणि पोलिस आरोपीच्या पायात गोळी घालून स्वतःची पाठ थोपटत आहेत. याशिवाय बसपा आणि भीम आर्मी देखील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी योगी सरकारलाही कोंडीत पकडत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा