मुंबई – राज्यात मुंबई-ठाण्यात व इतरत्र हरामाचा पैसा, भाजपाने निवडणुकीसाठी वापरला, असा ठाकरेगटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, राज्यातील भाजपावर आरोप केला आहे. फडणवीसांचा हा आत्मविश्वास आणि माज अफाट पैसा व सत्तेचा चालला आहे, तर मतदानाच्या निकालापूर्वीच्या फडणवीसांच्या विधानावरुन राऊतांनी, भाजपाला उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपावर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे.
आतापर्यंत मुंबईत ठाकरे़ म्हणजे, शिवसेनेची सत्ता होती, मुंबईत मराठी अस्मितेचा पराभव मराठी माणसाने घडवून आणला आहे. मुंबई ताब्यात घेण्यासाठी राज्यातील, सत्ताधारी भाजपा आणि शिंदेंगट शिवसेनेनी, काय काय राजकारण केले, हे मुंबईकरांना माहिती आहे.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांचे, मतदान व निकाल लागले आहेत. राज्यातील भाजपाने मुंबई-ठाण्यात व इतरत्र हरामाचा पैसा, निवडणुकीसाठी वापरला आहे, आणि राज्यातील सत्तेतल्या तिन्ही पक्षांकडे, हा हरामाचा पैसा होता. त्याच भ्रष्ट पैशांवर भाजपाने मुंबई अदानींच्या घशात घातली आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे.
राज्यात मराठी अस्मितेचा पराभव, मराठी माणसाने घडवून आणला आहे, ही मोठी खंत आहे, शोकांतिका आहे. मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल लागले आहेत. आतापर्यंत मुंबईत शिवसेनेची सत्ता होती. शिवसेनेने मुंबईला २३ महापौर दिले. हे सर्व महापौर कडवट मराठी होते. आता ही परंपरा पुढे राखली जाईल काय? असा प्रश्न पडावा, अशा प्रकारचे निकाल मुंबईत लागले आहेत.
राज्यातील मराठी माणूस, मराठी अस्मितेचा पराभव राज्यातील सत्ताधारी शिंदेगटाचे एकनाथ शिंदे, भाजपाचे देवेंद्र फडणवीस, आशीष शेलार, अमित साटम या मराठी माणसांनी घडवून आणला आहे. पुन्हा राज्यातील निवडणूक आयोगाची त्यांना संपूर्ण साथ मिळाली आहे. त्यामुळे या राज्यातील निवडणुका की, निवडणूक आयोगाने केलेल्या नेमणुका असा प्रश्न पडतो आहे. महाराष्ट्रात भाजपाची लाट आहे ,असे त्यांचे लोक सांगतात, पण ही लाट नसून सत्ता आणि भ्रष्ट पैशांचा माज चढलेला आहे.
या भ्रष्ट पैशांच्या जोरावर, मुंबई ताब्यात घेण्यासाठी राज्यातील सत्ताधारी भाजपा व मिंधे गट शिवसेनेने काय राजकारण करायचे बाकी ठेवले आहे? राज्यातील सत्ताधारी पक्षाचा हा आत्मविश्वास आणि माज, अफाट पैसा व सत्तेची नशा त्यांना चढली आहे.असे ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राज्यात या महापालिका निवडणुकीतही, राज्यातील निवडणूक आयोगाने प्रचंड गोंधळ घातला आहे. मराठी भागात मतदारांची नावे वगळली गेली, बोटावरची शाई पुसली जाईल, याची व्यवस्था करण्यात आली. गणेश नाईक यांच्या सारख्या मंत्र्यांचे नावही वगळले गेले. अशा हजारो घटना होऊनही, शेवटी मतदारांनी कर्तव्य बजावले.
राज्यातील सर्व निवडणुकांचे निकाल पूर्ण लागलेले नव्हते. मुंबईसह २०२६ २६ -२०२७ महापालिका जिंकू, असे देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीआधी सांगितले होते, हा आत्मविश्वास आणि माज, अफाट पैसा व सत्तेचा माज राज्यातील भजापाला चढलेला आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मुंबईत आले व म्हणाले, “मुंबई पालिकेत आम्ही २०० जागा जिंकून दाखवतो.” देशातील भाजपाचा हा आत्मविश्वास विकासकामांचा अजिबात नाही, तर यंत्र, पैशांचा मंत्र व दबाव तंत्राचाच आहे, असे ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.





