केरळमध्ये तरुणीने गैरवर्तन केल्याचा आरोप व सोशल मिडीयावर , व्हिडीओ व्हायरल केल्यामूळे एका तरूणाची आत्महत्या

SHARE:

केरळ – केरळमध्ये सोशल मिडीयावर तरुणीने गैरवर्तन केल्याच्या आरोपामूळे, व व्हिडीओ व्हायरल केल्यामूळे एका तरूणाने आत्महत्या केली आहे. या घटनेआधी काही दिवसांपूर्वी दीपक यू नावाच्या तरुणाने, प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये तरुणीशी गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याचा, व्हिडीओ व्हायरल झाला होता. गर्दीने भरलेल्या बसमध्ये इन्फ्लुएन्सर तरुणीने आरोप करत, व्हिडीओ व्हायरल केला होता. याप्रकरणात केरळमधील पुथियारा येथे एका तरुणाने स्वतःला संपवले आहे.

केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळमध्ये सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर तरुणीने, गर्दीने भरलेल्या बसमध्ये लागलेल्या धक्कयानंतर, केलेल्या आरोपांनंतर एका ४२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ४ त ५  दिवसांपूर्वीच या आत्महत्या केलेल्या, दीपक यू नावाच्या तरुणाने प्रवाशांनी तुडूंब भरलेल्या बसमध्ये, एका तरुणीशी गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याचा व्हिडीओ ,सोशल मिडीयावर व्हायरल झालेला होता. दीपकच्या कुटुंबियांनी त्या तरुणीने केलेले आरोप, खोटे असल्याचे आणि केवळ पैशांसाठी व्हिडीओ बनवले असल्याचे म्हटले होते.

शिमजिथा मुस्तफा या व्हिडीओ इन्फ्लुएन्सरने आपल्या, सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये बसमधून प्रवास करताना तरुणाने, चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप तिने केलेला होता. तिचा हा आरोपांचा व्हिडीओ सोशल मीडियावर, मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्या तरूणाचं नाव दीपक यू आहे, तो पुथियारा या ठिकाणी त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. तो एका गारमेंट फॅक्टरीत काम करत होता.

दीपक १६ जानेवारी रोजी कामासाठी कन्नूरला गेला होता. तिथून तो पय्यानूर रेल्वे स्थानकातून अरिकोडला जाणाऱ्या खासगी बसने प्रवास करत असतानाच, त्याच बसमध्ये शिमजिथा मुस्तफा देखील प्रवास करत होती. शिमजिथाने बसमध्ये एक १८ सेकंदाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने आरोप केला होता की, दीपकने जाणीवपूर्वक तिला स्पर्श केला आहे. दीपकच्या कुटुंबियांनी याबाबत बोलताना, त्याने जाणीवपूर्वक नाही तर गर्दीत चुकून लागलेला धक्का, असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने, दीपक मानसिक तणावाखाली होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाल्यानंतर दीपक जास्तच मानसिक तणावाखाली गेला होती. 2 दिवस त्याने काही खाल्ले नाही. रविवारी सकाळच्या सुमारास ७ वाजता आई-वडील त्याला उठवण्यासाठी, त्याच्या रूममध्ये गेले पण त्याने दरवाजा उघडला नाही. शेजार्यांच्या मदतीने त्याच्या रूमचा दरवाजा तोडला असता, दीपकने गळफास घेतल्याचे दिसुन आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यात आले, व्हायरल व्हिडीओच्या दृष्टीकोनातूनही तपास केला आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्याने, अपमान झाल्याच्या भावनेने तो अस्वस्थ होता. या घटनेनंतर दीपकच्या कुटुंबियांनी ,महिला इन्फ्लुएन्सरने केलेले सर्व आरोप, फेटाळून लावले आहेत. त्याच्या वडिलांनी म्हटले की, आमचा मुलगा निर्दोष होता. तो असे करूच शकत नाही. व्हिडीओ व्हायरल होताच अपमान झाल्याच्या भावनेने, तो अस्वस्थ झाला होता होता. त्याचे कशातही लक्ष नव्हते, तो खातही नव्हता, याप्रकरणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू आणि न्याय मागू. व्हिडीओ पाहिल्यानंतर दीपक कोणाशीच बोलला नव्हता.

त्याने स्वतःला खोलीत बंद करून घेतल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे. या घटनेनंतर शिमजिथाने आणखी एक व्हिडीओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे. आपण आपल्या आरोपांवर ठाम असून दीपकने जाणीवपूर्वक स्पर्श केल्याचं म्हटले आहे. मात्र दीपकचा आधीचा व्हिडीओ तिने डिलिट केला आहे. याप्रकरणानंतर केरळ पोलिस अधिक तपास करत आहेत. याप्रकरणात सोशल मीडियाचा गैरवापर झाल्याचे, आत्महत्या केलेल्या तरूणांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे, तर केरळ पोलिस ही याप्रकरणात, गांभीर्याने चौकशी करत आहेत.

Leave a Comment

अधिक वाचा