बीड – जिल्ह्यात पुन्हा गुन्हेगारी वाढली आहे, बीडमध्ये लोखंडी रॉड, लाकडी दांड्यांनी, एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बीड जिल्ह्यातील हिंसाचाराच्या घटना, थांबण्याचे नाव घेत नसल्याचे, पुन्हा एकदा समोर आले आहे. आता बीडमध्ये पुन्हा एका तरुणाला, लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आली आहे, या प्रकरणाचा घटनाक्रम थरकाप उडवणारा आहे.
बीड जिल्हा हा दिवसेंदिवस गुन्हेगारांचे घर बनत चालला आहे. पुन्हा एकदा या बीड जिल्ह्यात एक बेदम मारहाणीची घटना घडली आहे. बीडमध्ये काही महिन्यांपुर्वीच संतोष देशमुखांच्या, निर्घृण हत्येने देशभर खळबळ उडवली होती. तर या आताच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, खर्डेवाडी गावात सुमारे 3 दिवसांपूर्वी घडली आहे. संदीप आहेर असे जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १० वाजता गावातील धनराज भोसले हा संदीप आहेर यांच्या घरी गेला. सुरुवातीला त्याने शिवीगाळ केली आणि वाद वाढवत, घरासमोरच मारहाण सुरू केली.
गावातील धनराज भोसले या आरोपीने, लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याचा वापर करून, संदीप आहेर यांना बेदम मारहाण केली. डोक्यावर, पाठीवर आणि हातापायांवर जोरदार, वार करण्यात आले आहेत. मारहाणीच्या आवाजाने आजूबाजूचे, नागरिक गोळा झाले, मात्र आरोपीच्या दहशतीमुळे कुणीही, मध्ये पडण्याची हिंमत केली नाही, असे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. धनराज भोसले याची गावात आधीपासूनच दहशत असल्याचा, आरोप नागरिक करत आहेत. यापूर्वीही त्याने अनेक लोकांना मारहाण, केल्याच्या घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याच्यावर ठोस कारवाई होत नसल्यामुळे, तो अधिक आक्रमक होत असल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे. जखमी तरुणावर सध्या बीडच्या, शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे, त्याची प्रकृती गंभीर आहे.
या घटनेनंतर जखमी तरुणाच्या कुटुंबीयांनी, आरोपीवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. संदीप आहेर यांच्या पत्नीनेही आरोपीविरोधात, तीव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास नेकनुर पोलीस करत असून, आरोपीविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
बीड जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे, सामान्य नागरिकांमध्ये, असुरक्षिततेची भावना वाढत आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली, तरच भविष्यात अशा घटना थांबतील, अशी अपेक्षा ग्रामस्थ आणि पीडित कुटुंब व्यक्त करत आहेत. बीडमध्ये एक धक्कादायक घडलेल्या या प्रकाराने ,सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा, प्रश्न निर्माण आला आहे. बीड पोलिसांनी आरोपीला तात्काळ कडक कारवाई करावी व अटक करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे. कुटुंबाच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात अशा वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमूळे ,सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. याप्रकरणात अधिक तपास बीड पोलिस करत आहेत.




