बदलापूर – मुंबईत शिंदेगट शिवसेनेच्या नगरसेवकाला, भाजप पदाधिकाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. बदलापुरमध्ये सत्ताधाऱ्यांमधील वाद आहे. बदलापुरातील शिवसेना शिंदे गट आणि भाजपामधील वाद वाढतच चालला आहे. शिंदेगट शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजप पदाधिकाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
राज्यात आणि केंद्रात एकत्र सत्तेत असलेले शिवसेना शिंदे गट आणि भाजप बदलापूर शहरात मात्र पुन्हा एकदा त्यांचा अंतर्गत वाद समोर आला आहे. बदलापुरातील सोनिवली परिसरात शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे यांना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी, बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण मारहाणीची घटना, सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सोनिवली भागातील आत्मिया हाईटस सोसायटीमध्ये माघी गणपतीच्या दर्शनासाठी, शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक हेमंत चतुरे हे आले होते. यावेळी अचानक भाजप पदाधिकारी तेजस मस्कर आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी, चतुरे यांना अडवून वाद घातला. हा वाद हाणामारीत रूपांतरित झाला, आणि चतुरे यांना बेदम मारहाण करण्यात आली.
या मारहाणीचा सगळा प्रकार सोसायटीतील, सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला आहे. या फुटेजमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. सोशल मीडियावरही या घटनेची, मोठी चर्चा सुरू आहे. मारहाणीत जखमी झालेले हेमंत चतुरे हे, शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक आहेत. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत चतुरे यांचा, भाजपच्या उमेदवारासमोर पराभव झाला होता. मात्र, त्यानंतरही शिवसेना शिंदे गटाने त्यांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्यामुळे, भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.या नाराजीतूनच ही मारहाण करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, संजय जाधव यांनी केला आहे.
या मारहाणीत हेमंत चतुरे हे जखमी झाले असून, बदलापूरमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी, रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. राज्यात आणि केंद्रात शिवसेना शिंदे गट आणि भाजप एकत्र सत्तेत असतानाही, बदलापूर शहरात मात्र दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये अंतर्गत वाद वाढला आहे. यापूर्वीही राज्यातील या सत्ताधारी असलेल्या दोन्ही पक्षांमध्ये वाद, आरोप-प्रत्यारोप आणि संघर्षाच्या घटना घडल्या आहेत. मारहाण प्रकरणामूळे, बदलापूर परिसरातून शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात बदलापूर पोलिस, सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.




