ओडिसा – राज्यात ख्रिश्चन समुदायांवर हल्ला करण्यात आला आहे. तर ३० ख्रिश्चन कुटुंबांना गावातून हाकलून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ओडिसामधील नवरंगपूरमध्ये प्रार्थनेवरून ख्रिश्चन लोकांवर हल्ला करण्यात आला आहे. ख्रिश्चन लोकांच्या चर्चला कुलूप लावण्यात आले आहे. ओडिसाच्या नवरंगपूर जिल्ह्यातील कापेना गावात एका हिंदु गटाने लाऊडस्पीकरवरून ख्रिश्चन लोकांना धमकावले आहे, ख्रिश्चन लोकांना चर्च पाडण्याची आणि धार्मिक उपक्रम सुरू ठेवल्यास ३० ख्रिश्चन कुटुंबांना गावातून हाकलून लावण्याची धमकी दिली आहे.
ओडिसाच्या नवरंगपूर जिल्ह्यातील कापेना गावात ख्रिश्चन समुदायाच्या सदस्यांना छळ केला आहे, ख्रिश्चन समुदायाला प्रार्थना करण्यापासून रोखण्यात आले, आहे असा आरोप करण्यात आला आहे. गावातीलच हिंदु गटाने लाऊडस्पीकरवरून धमक्या दिल्या आहेत. १५० कुटुंबे असलेल्या या गावात बहुसंख्य ख्रिश्चन, आता चर्चच्या स्थलांतराची मागणी करत आहेत. आणि ३० कुटुंबांच्या ख्रिश्चन समुदायाने आयोजित केलेल्या प्रार्थनेला विरोध करत आहेत. गावातील बहुतेक रहिवासी गोंड, भात्रा आणि सांता समुदायाचे आहेत आणि त्यांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत काही कुटुंबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आहे. ही घटना रविवार, २५ जानेवारी रोजी घडली आहे. स्थानिक रहिवासी टुना सांता यांनी सांगितले की, “जेव्हा लोकांनी प्रार्थना का थांबवावी असे विचारले, तेव्हा आरोपींनी चर्चला बाहेरून कुलूप लावले आणि सर्वांना जबरदस्तीने बाहेर काढले. “हा धमकी देणारा जमाव हिंदू राष्ट्रवादी संघटनांशी संबंधित होता. ज्यांनी ख्रिश्चन लोकांना हिंदू धर्मात परत येण्याचा इशारा दिला आहे.
स्थानिकांचा आरोप आहे की त्याच हिंदू गटाने, दुसर्या दिवशी ख्रिश्चन समुदायातील २ तरुणांवर हल्ला केला आहे. उमरकोट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. गावात २ गटांमध्ये तणाव आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. उमरकोट पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक रामाकांत साई यांनी सांगितले की, “आम्हाला या विषयावर अद्याप कोणतीही तक्रार मिळालेली नाही, परंतु घटनेची माहिती मिळाल्यानंतर, परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.“ दोन्ही पक्षांच्या सदस्यांचा समावेश असलेली शांतता समिती स्थापन करण्यात आली आहे. आणि नवरंगपूर उपजिल्हा दंडाधिकारी प्रकाश कुमार यांच्या देखरेखीखाली गावात एक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
नवरंगपूरचे जिल्हाधिकारी महश्वर स्वैन यांच्या मते, हा गावातीलच हिंदू जमाव “अतिक्रमित जमिनीवर“ बांधलेल्या आणि त्यातील काही भाग प्रार्थनास्थळ म्हणून वापरला जात असलेल्या चर्चला विरोध करत होता.जिल्हाधिकारयांनी सांगितले की, “शांतता समितीच्या निर्णयानुसार, प्रार्थनास्थळ स्थलांतरित करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. आणि दोन्ही गटांना हा प्रश्न सोडवण्यास आणि पूर्वीप्रमाणेच शांततेने राहण्यास सांगण्यात आले आहे.”
नॅशनल ख्रिश्चन फ्रंट ओडिशा युनिटचे सरचिटणीस पल्लव लिमा म्हणाले की, अशा घटना जाणूनबुजून चिथावणीखोरी आणि ध्रुवीकरण करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. ते म्हणाले, “नवरंगपूर प्रकरणात, ख्रिश्चन समुदायांवर अन्याय, अत्याचार केला जात आहे.” एका गावात प्रार्थनेचे नेतृत्व केल्याबद्दल, एका पाद्रीवर हिंदुत्ववादी जमावाने हल्ला केला होता. काही आठवड्यांनंतर ही घटना पुन्हा घडली आहे. ४ जानेवारी २०२६ रोजी, पाद्री बिपिन नायक प्रार्थना सभा घेत असताना, जमावाने जबरदस्तीने सभा थांबवली, त्यांचे हात बांधले, त्यांना काठ्यांनी मारहाण केली, त्यांना चप्पलाचा हार घालून मारले. २१ जानेवारी २०२६ रोजी या प्रकरणात ९ जणांना अटक केली आहे.




