राशीभविष्य – आज ३० जानेवारी २०२६ चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस आपण देवी महालक्ष्मी ला समर्पित करतो. तसेच, आजच्या दिवशी पूजा करतात. उपवास धरतात. आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. घरात सुख-शांती, समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना करतात. ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व १२ राशींचं आजचं राशीभविष्य.
मेष रास
मेष राशीसाठी आजचा दिवस भरभराटीचा असणार आहे. आजच्या दिवसात तुमच्या संपत्तीत वाढ दिसून येईल. पण, या पैशांचा विचारपूर्वक वापर करा. तसेच, सरकारी योजनांचा लाभ घ्याल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल.
वृषभ रास
वृषभ राशीचे लोक आज आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतील. सकाळपासूनच तुम्हाला सकारात्मक वाटेल. तसेच, प्रेमाच्या बाबतीत आज तुमची स्थिती चांगली असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो.
मिथुन रास
मिथुन राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्हाला सतत एखाद्या गोष्टीबाबत चिंता सतावेल. संध्याकाळच्या वेळी धार्मिक स्थळाला भेट द्या. दिवसाच्या शेवटी तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडू लागतील.
कर्क रास
कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता देखील मिळू शकते.
सिंह रास
सिंह राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. आज तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमची कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील.
कन्या रास
कन्या राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुमच्या आर्थिक संपत्तीत वाढ झालेली दिसेल. धार्मिक कार्यात तुमचा सहभाग लाभेल. प्रेमाच्या बाबतीत तुमची स्थिती चांगली असेल. तसेच, भगवान शंकराची तुमच्यावर विशेष कृपा राहील.
तूळ रास
तूळ राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही फार व्यस्त असाल. स्वत:ला देण्यासाठी वेळ नसणार. तसेच, प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील. जवळच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता मिळू शकते. तसेच, तुमची रखडलेली कामेही तुम्हाला पूर्ण करता येतील. दत्तगुरुंच्या कृपेने तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील.
धनु रास
धनु राशीने आजच्या दिवशी सावधानता बाळगावी. शत्रूंची तुमच्यावर वाईट नजर असू शकते. त्यामुळे तुमच्या कोणत्याही कामात दिरंगाई करु नका. समाजाता तुमचा मान-सन्मान टिकून राहील. कामाच्या निमित्ताने प्रवास सुरु राहील.
मकर रास
मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल.
कुंभ रास
कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही.
मीन रास
मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल रयत रक्षक न्यूज कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





