पुणे – भाजपा राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या पुणे जिल्ह्यात ठाकरे शिवसेनेचा खेड पंचायत समितीवर विजय झाला आहे. पुण्यातील खेड पंचायत समितीवर ठाकरे शिवसेनेची सत्ता आली आहे, तर विजय मिळवून देणाऱ्या आमदाराला या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मात्र मोठा धक्का बसला आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचे निकाल लागले आहे. दुपारनंतर निकालाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे वचर्स्व असलेल्या पुणे जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसनेने मोठा विजय मिळवला आहे.
पुण्याच्या खेड पंचायत समितीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आली आहे. १६ पैकी १२ जागांवर ठाकरेंच्या शिवसेने विजय मिळविला आहे. जिल्हा परिषदेलाही ५ जागांवर विजय मिळवला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय झाला असला तरी, आमदार बाबाजी काळेंना मात्र, मोठा धक्का बसला आहे. आमदार बाबाजी काळे यांच्या बहिणीचा पराभव झाला आहे. गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती आमदार काळेंची झाली आहे. जुन्नर तालुक्याच्या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातून उबाठा शिवसेनेचे गुलाब पारखे १६६४ मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजपच्या पुणे जिल्हा परिषदेतील गटनेत्या आशाताई बुचके यांचा पराभवाचा झाला आहे.
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी सरपंच निर्मला नवले यांचा पराभव झाला आहे. कारेगाव पंचायत समिती गणातील माजी सरपंच निर्मला नवले यांचा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. शिरूरच्या न्हावरा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला धक्का दिला आहे. तर दिवंगत माजी आमदार बाबूराव पाचर्णेंच्या पत्नी मालती पाचर्णे पराभूत झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या वृषाली वाळकेंनी मालती पाचर्णे यांचा पराभव केला आहे.





